ऑपरेशन सिंदूर च्या गौरवार्थ सोयगाव शहरात भव्य तिरंगा यात्रा उत्सवात-



दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.19- भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादीअड्डे उध्वस्त केले.त्या अनुषंगाने ऑपरेशन सिंदूर या लष्करी मोहिमेतील भारतीय सशस्त्र दलाच्या अतुलनीय शौर्याचा गौरव करीत सैन्यांचे मनोबल उंचावण्यासाठी सोमवारी सोयगाव शहरात भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. 

ही तिरंगा यात्रा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरा पासून सुरू होऊन आमखेडा , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वाल्मिक नगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक , बस स्थानक मार्ग श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे संपन्न झाली. या तिरंगा यात्रेत माजी सैनिक गणेश जावळे, शशिकांत काळे , सिताराम पाटील सहभागी झाले होते यावेळी त्याचा सत्कार करण्यात आला. माजी सैनिक सिताराम पाटील व पुष्पाताई काळे यांनी मनोगत व्यक्त केले. या तिरंगा पदयात्रेत सुरेश बनकर, नागेश्वर मोटे, पुष्पाताई काळे,जयप्रकाश चव्हाण, संजय पाटील, बद्री राठोड, वसंत बनकर, योगेश पाटील, राहुल राठोड, सुनील ठोंबरे , दिपक पाटील,सुनील गावंडे,मोतीलाल वाघ, दिलीप पाटील,संजीवन सोनवणे,राहुल गिरी, संजय चौधरी, संजय मंडवे, दगडू आस्वार,संजय तायडे,मानस झंवर,अनिस तडवी, आनंदा इंगळे, वंदना पाटील, नंदा आगे, नीलिमा पवार, लक्ष्मीबाई पाटील, ईश्वर शिरसागर, बाळू पाटील, नीलेश नागपुरे ,किरण पाटील, गजानन शिरसाठ आदींसह मोठय़ा संख्येने नागरिक सहभागी झाले होते.तिरंगा यात्रेचे समारोपाचे प्रास्ताविक संजय पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन राहुल राठोड यांनी केले.

Post a Comment

0 Comments