लक्ष्मीवाडी येथील सोमैय्या विद्यालयातील सर्व माजी विद्यार्थ्यांचा दिवाळीनंतर भव्य मेळावा--भारत आगलावे पा.

शिर्डी( प्रतिनिधी)- राहाता तालुक्यातील लक्ष्मीवाडी येथील सोमैय्या विद्यामंदिर येथील सर्वच माजी विद्यार्थ्यांचा मेळावा दिवाळीनंतर भरण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते व या शाळेचे माजी विद्यार्थी भारत आगलावे यांनी दिली आहे. 
 लक्ष्मीवाडी येथील सोमैय्या विद्यामंदिर येथे नुकताच ठराविक माजी विद्यार्थी, माजी शिक्षक व सर्व विद्यमान शिक्षक, शिक्षिका यांचे छोटे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते.यावेळी उपस्थित प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या या शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. एकमेकांची खुशाली विचारपूस केली. शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.

 तसेच दिवाळीनंतर या विद्यालयातील सर्वच माजी विद्यार्थी, माझे शिक्षक यांचा उद्योगपती समीरशेठ सोमैया यांचे उपस्थितीत भव्य मेळावा माजी विद्यार्थी, शिक्षक व शाळा यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यावर चर्चा झाली. उद्योजक समीरशेठ सोमैया हे दानशूर व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचे वडील, आजोबाही शिक्षण प्रेमी होते.त्यांनी येथे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकास व प्रगती साठी कोट्यवधी रुपये खर्च केलेले आहेत. त्यांचे येथे मोठे योगदान आहे. त्यामुळे येथे उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांनी सोमैय्या परिवाराचे अभिनंदन केले.

लक्ष्मीवाडी येथील सोमैय्या विद्यालयातील सर्व माजी विद्यार्थ्यांचा दिवाळीनंतर भव्य मेळावा--भारत आगलावे पा. धन्यवाद मानले. व दिवाळीनंतर मेळाव्या घेण्याचे ठरले. तसेच आपल्या या शाळेतील विद्यार्थी आज मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी व इतर माजी विद्यार्थी यांनी एकत्र येऊन एक नीधी गोळा करून शिक्षक व माजी विद्यार्थी यांचे जॉईन खाते उघडून त्या खात्यामध्ये ती रक्कम टाकण्यात येईल. सर्व निधी हा पारदर्शीपणे खर्च करण्यात येईल. विद्यार्थ्यांसाठी जे गरजेचे आहे त्यासाठी तो निधी खर्च केला जाईल असे सर्वानुमते ठरले आहे. ज्यांना वैयक्तिक योगदान द्यायचे आहे ते देऊ शकतात असेही बैठकीत ठरले आहे. अशी माहिती या विद्यालयातील माजी विद्यार्थी भारत आगलावे पा. यांनी दिली आहे. या याप्रसंगी मनोज दोडीया, जितेंद्र काशिनाथ दवे. लालु जाधव.मनोज काळे.मनोज हजारे . शरद कवडे, श्री.उगले, नितीन आगलावे. महेश जपे, भैय्या जपे,
भैय्या अहिरे.निघुते. श्री पवार.श्री मते.माजी शिक्षिका छायाताई देशपांडे.माजी विद्यार्थीनी सौ.प्राजक्ता कुलकर्णी.सौ.वाघ. सर्व शिक्षक, शिक्षिका व माजी विद्यार्थी शिक्षक व विद्यार्थीनी हजर होते. प्रथम सर्वांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे.व शेवटी धन्यवाद मानण्यात आले. असे भारत आगलावे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments