शिर्डी मध्ये भारतीय सैन्य दलाने केलेल्या अतुलनीय कामगिरीचा गौरव व संपूर्ण भारतीय नागरिक हे भारतीय सैन्य दलाच्या भक्कमपणे पाठीमागे उभे आहोत हे दाखवण्यासाठी शिर्डीमध्ये देशप्रेमी नागरिकांकडून भव्य दिव्य अशी तिरंगा रॅली सोमवारी काढण्यात आली. या तिरंगा रॅलीमध्ये राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच युवक नेते डॉक्टर सुजय विखे पाटील हे सहभागी झाले होते.
तिरंगा रॅलीमध्ये स्वतः नामदार राधाकृष्ण विखे पाटील हिंदुस्तान जिंदाबाद पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत होते. तिरंगा रॅली सामील झालेल्या सर्वांच्या हातात तिरंगा फडकत होता. अनेकांच्या हातात फलक होते. शिस्तबद्ध रीतीने ही तिरंगा रॅली शिर्डी शहराच्या रस्त्यावर जात असताना साईभक्त ही या तिरंगा रॅलीत मोठ्या आनंदाने सामील झाल्याचे दिसून येत होते. तिरंगा रॅली दरम्यान शिर्डी मध्ये सर्वत्र देशमय वातावरण झाले होते . घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. शिर्डी व परिसरातील गावांमधूनही मोठ्या संख्येने नागरिक या तिरंगा रॅलीत सामील झाले होते.
0 Comments