द्राक्ष व डाळिंब पिकासाठी जशी मेहनत घेतली जाते तशी मेहनत उसाच्या पिकासाठी घ्यावी - डॉ सोमनाथ गोरे


विजय बोडखे 

राजुरी वार्ताहर द्राक्ष व डाळिंब पिकासाठी जशी मेहनत घेतली जाते तशी मेहनत उसाच्या पिकासाठी घेतल्यास उसाचे टनेज वाढून चांगले उत्पन्न मिळू शकते असे प्रतिपादन पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक डॉ सोमनाथ गोरे पाटील यांनी केले आहे.  
                                राहाता तालुक्यातील राजुरी येथील ग्रामपंचायतचे उपसरपंच व सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सोमनाथ बाळासाहेब गोरे पाटील यांची पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल ते बोलत होते. डॉक्टर गोरे पुढे म्हणाले की सध्याच्या काळात भरपूर समस्या आहे परंतु या समस्या सोडविण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले तर यश नक्की मिळते.द्राक्ष व डाळिंब उत्पादनासाठी शेतकरी जसे कष्ट करतात व भरपूर उत्पन्न मिळवतात तसे ऊस लागवडी नंतर  तशीच मेहनत केली तर उत्पन्न जास्त मिळून पैसाही भरपूर मिळेल यासाठी शेतकऱ्यांनी ऊस  लागवडीकडे वळावे असे सांगून,
 माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला नामदार राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर सुजय दादा विखे पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांनी जो विश्वास दाखवून मला संचालक केले. या मध्ये राजुरी गावातील सर्वसामान्य जनतेचा व कार्यकर्त्याच्या पाठिंबावरच हे शक्य झाले आहे. त्याबद्दल मी त्यांचे व ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार मानतो. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. गावातील कार्यकर्ते व मित्र मंडळाच्या वतीने नवनिर्वाचित संचालक डॉ सोमनाथ गोरे पाटील यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी कृषी अधिकारी सूर्यभान गोरे होते. या कार्यक्रमास ज्येष्ठ कार्यकर्ते विखे पाटील कारखान्याचे माजी संचालक प्रकाश नाना गोरे, मच्छिंद्र पाटील पठारे, ममदापूर गावचे पोलीस पाटील ज्ञानदेव कळमकर, डाळिंब रत्न बाबासाहेब गोरे, प्रवरा सहकारी बँकेचे तज्ञ संचालक एडवोकेट काकासाहेब गोरे, राजुरी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सोपानराव कदम, व्हॉइस चेअरमन सुधीर गोरे, तंटामुक्तीचे अध्यक्ष संजय गोरे, उपाध्यक्ष जालिंदर पठारे, राजुरी सोसायटीचे सचिव बाळासाहेब गोरे, सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब बेंद्रे, भाऊसाहेब बेंद्रे सर,युवक कार्यकर्ते गजानन गोरे, रमेश गोरे, शिवनाथ गोरे, ज्ञानदेव दिवे, राजेंद्र गायकवाड सर,माजी सरपंच बाबासाहेब कदम, राहता तालुका दूध संघाचे माजी संचालक भास्करराव कदम, सतीश तेलोरे, विष्णू खर्डे, संतोष गोरे, माजी उपसरपंच जालिंदर गोरे, पारधे साहेब, डाळिंब रत्न बाबासाहेब भालेराव, कान्हा आदक, बाबासाहेब राहींज, योगेश गोरे, ग्रामपंचायत सदस्य भगवान गोरे, दत्तात्रेय गोरे, नाना लाळगे,शौकत पठाण, राहुल पेंढारे, हौशीराम जाधव, गंगाधर लाळगे, सोन्या गोरे, दिलीप गोरे,कार्तिक गोरे, कल्पेश गोरे गंगाधर लाळगे, भारत गोरे दिलीप त्रिभुवन, सचिन गोरे, कुंडलिक गोल्हार,मच्छिंद्र  गोल्हार. पत्रकार विजय बोडखे यांच्यासह गावातील युवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रवरा सहकारी बँकेचे तज्ञ संचालक ॲड काकासाहेब गोरे यांनी केले.

Post a Comment

0 Comments