प्राईड'चा दहावीचा निकाल १०० टक्के गौरी गणेश कवडे ९४. ८० टक्के गुण मिळवून अशोकनगर केंद्रात प्रथम

दिलीप लोखंडे 

टाकळीभान प्रतिनिधी  :- माऊली प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्ट संचलित प्राईड अकॅडेमी इंग्लिश मेडीअम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, भेर्डापूर-वांगी महाविद्यालयाचा शैक्षणिक वर्ष २०२४-२५ चा इयत्ता १० वी चा निकाल १०० टक्के लागला असून शाळेची विद्यार्थीनी कु. गौरी गणेश कवडे हिने ९४. ८० टक्के गुण मिळवून केंद्रात प्रथम आली आहे. शाळेची १० वी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची ही पहिली बॅच होती.
कु. अनुष्का संदीप कवडे या विद्यार्थिनीने ९३. २० टक्के गुण मिळवून द्वितीय तर कु. प्रेरणा उमेश गायकवाड या विद्यार्थिनीने ९२ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक ज्ञानेश्वर मुरकुटे व प्राईड अकॅडेमीच्या संस्थापिका तथा पंचायत समिती मा. सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक समिती, शाळेच्या प्राचार्या, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रामस्थ यांनी या यशस्वी विद्यार्थांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments