राजकुमार गडकरी
शिर्डी ( प्रतिनिधी) शिर्डीत श्री साईबाबांकडे काही मागण्यासाठी मी आज आलेलो नाही तर फक्त साईबाबांचे आभार मानण्यासाठी आलो आहोत. असं मत मुंबई इंडियन्सचा प्रसिद्ध क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांनी शिर्डीत व्यक्त केलं. सूर्यकुमार यादव हा पत्नी देवीच्या शेट्टी सह शुक्रवारी शिर्डीत आला. त्यांनी मंदिरात जाऊन श्री साई समाधीचे दर्शन घेतले.
श्री साई संस्थांनच्या वतीने त्यांचा श्री साई मूर्ती व शाल देऊन सत्कार करण्यात आला.काही दिवसापूर्वीच मुंबई इंडियन संघातील हा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव व त्याची पत्नी देविशा शेट्टी हे मुंबई इंडियन क्रिकेट संघाचे मालक आकाश अंबानी सह शिर्डीला आले होते .त्यांनी साईबाबांचे त्यावेळी साईदर्शन घेतले तसेच शिर्डी माझे पंढरपूर ही आरती केली होती. संस्थांनच्या संग्रहालयात जाऊन त्यांनी साईबाबांनी वापरलेल्या वस्तूंची संग्रहालयात पाहणी केली होती. आज शुक्रवारी परत सूर्यकुमार यादव साई दर्शनासाठी आला होता.
भारत-पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या वाढत्या तणावामुळं काही काळासाठी आयपीएल स्थगित करण्यात आलं होतं. मात्र आता परिस्थितीत बदल झाल्यानं आयपीएलचा चालू हंगाम पुन्हा एकदा शनिवारपासून सुरु होत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्स संघातील स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवनं पत्नी देविशा शेट्टीसह आज शुक्रवारी शिर्डीला येऊन साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं आहे.पुन्हा एकदा आयपीएल सुरु होत असल्यानं सुर्यकुमार यादवच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आनंद झळकत होता.
भारत पाकिस्तान युद्ध परिस्थिती निवळल्यानंतर आयपीएलच्या 18व्या हंगामातील उर्वरित सामने शनिवार 17 मे पासून सुरु होत आहे .मुंबईचा सामना 21 मे रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. आता नव्याने परत आयपीएलचे उर्वरित सामने सुरू होत असल्यामुळे क्रिकेटचे चाहते ही आनंदी आहेत. त्यात सूर्यकुमार यादव शिर्डीत आल्याचे समजताच त्याला पाहण्यासाठी व त्याला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित साईभक्त, क्रिकेट चाहते यांनीही संस्थान प्रवेश द्वारा बाहेर गर्दी केली होती.
0 Comments