चिंचोली विद्यालयाची निकालाची उत्कृष्ट परंपरा कायम !

विजय बोडखे 
राजुरी वार्ताहर चिंचोली विद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.
            लोकनेते डॉ बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित)प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कै.जनार्दन काळे पाटील विद्यालय चिंचोली एच.एस.सी व एस.एस.सी. बोर्ड परीक्षा- २०२५ मध्ये यश संपादित केले असून सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक  अभिनंदन विद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
              कनिष्ठ महाविद्यालयाचा कला व विज्ञान शाखेचा शेकडा निकाल १००% लागला. तसेच विद्यालयाचा इयत्ता दहावीचा शेकडा निकाल ९१.१३% लागला आहे इयत्ता बारावी विज्ञान शाखेतील प्रथम तीन क्रमांक
प्रथम .काळे कृष्णा प्रमोद 73.00%(तसेच पाथरे केंद्रात द्वितीय क्रमांक)द्वितीय क्रमांक-चि.काळे समृद्धी विजय-69.33% तृतीय क्रमांक-कु. काळे कृतिका सुनील-66.17% कला शाखेतील प्रथम तीन क्रमांक प्रथम क्रमांक-चि.संसारे संदीप एकनाथ-59.17% द्वितीय क्रमांक-कु.शेख आशिया गणी-53.67% तृतीय क्रमांक-कु. सोनवणे शितल दिलीप-52.33%
विद्यालयातील इयत्ता दहावी प्रथम तीन क्रमांक प्रथम- चि. लांडे संकेत जितेंद्र-87.00% द्वितीय- कु. गलांडे वेदिका किरण-86.40% तृतीय- चि. गलांडे ओंकार नितीन-85.80% टक्के गुण प्राप्त केले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय नामदार डॉ.राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य, माजीजिल्हा परिषद अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अहिल्यानगर, युवा नेते पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी खासदार सन्माननीय डॉ सुजय दादा विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ सुष्मिता विखे पाटील, संस्थेच्या शिक्षण संचालिका सौ सरोदे मॅडम व सर्व संचालक मंडळ यांच्यावतीने तसेच मा.अशोकराव पा.गागरे संचालक प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था , मा. बाळासाहेब पाटील लाटे संचालक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना , मा.संभाजी दादा आरगडे पाटील संचालक ट्रक वाहतूक सोसायटी प्रवरानगर, स्थानिक स्कूल कमिटी,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे प्राचार्य मा.श्री चिंधे भिमराज सर, पर्यवेक्षक श्री गिरी सर उच्च माध्यमिक विभाग इन्चार्ज श्री दिलीप आठरे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक वृंद तसेच ग्रामस्थ चिंचोली यांच्यावतीने हार्दिक शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments