दिलीप लोखंडे
टाकळीभान- मद्यपानकरुन बस चालवणार्या वाहकामुळे ३७ प्रवांशांचा जीव टांगणीला लागुन थोडयात जीव बचावल्याची भावना बस प्रवाशांनीअनुभवली.श्रीरामपुर-नेवासा राज्यमार्गावर वडाळामहादेव.
परीसरातीललक्ष्मीनारायण पेट्रोलपंपानजीक शिर्डी हुन संभाजीनगरला चाललेली बस रात्री आठच्या सुमारास भरधाव वेगात ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरुन येणार्या महिंद्रा पिकअप या मालवाहक गाडीवर जाऊन आदळली.समोरासमोर झालेल्या या धडकेत पिकअप वाहनाचे मोठे नुकसान झाले तर बसच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले.सुदैवाने बसमधील प्रवाशी किरकोळ जखमाव्यतिरीक्त बालंबाल बचावले.बसचा चालक मद्यपान केलेल्या अवस्थेत सापडल्याने प्रवाशांनी एसटी महामंडळावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
रविवार १९ मेच्या रात्री आठच्या सुमारास पिंपळगाव फुणगी(ता.राहुरी) येथील साहील शेख हे आपल्या मालवाहक पिकअप गाडीक्रमांक एम एच १७ बीडी १३११ या गाडीत मोकळे कॅरेट घेऊन श्रीरामपुर कडे चालले होते.तर पालघर डेपोची बस क्रमांक एम एच १४ बीटी २४१२ ही बस शिर्डीहुन संभाजीनगरला चालली होती.समोरासमोर झालेल्या या अपघातात पिकअप चालक किरकोळ जखमी झाला.अपघातानंतर प्रवाशांनी व स्थानिक नागरीकांनी बसचालक विनोद रोहीदास राठोड यास जाब विचारला असता बसचालक मद्यपान केलेल्या अवस्थेत आढळुन आला.यानंतर रात्री उशीरापर्यंत बसचालकावर तक्रार दाखल करण्याचे काम श्रीरामपुर शहर पोलीस ठाण्यात सुरु होते.
घटनास्थळी स्थानिक तरुण ईम्राण पठाण,जमीर पठाण,आयाज पठाण,आसिफ पठाण,फय्याज सय्यद,आस्लम पठाण यांसह नागरीकांनी प्रवाशांना मदतीचा हात देत सहकार्य केले.
0 Comments