छत्रपती संभाजीनगर केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनच्या वार्षिक सभेत सामाजिक कार्यकर्ते संजय शहापूरकर यांचा गौरव--



दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.18-  कुपोषण कमी करण्यासाठी सतत  प्रयत्न करणारे सोयगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय शहापूरकर यांचा छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) केमिस्टं ड्रगिस्ट असोसिएशनच्या वार्षिक सभेत गौरव करण्यात आला.

 याप्रसंगी छत्रपती संभाजीनगर केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे अध्यक्ष नितीन देशमुख यांनी सांगितले की दुर्गम भागात जिल्हा केमिस्ट अँड रजिस्ट असोसिएशनच्या सहकार्याने संजय शहापूरकर आरोग्य शिबिर घेऊन कुपोषित बालकांना मोफत औषधी वाटप करीत आहे त्यामुळे तालुक्यातील कुपोषण कमी झाले आहे. 
 केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव विनोद लोहाडे यांनी सांगितले की अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे  यांनी सोयगाव तालुका कुपोषण मुक्त व्हावा यासाठी लोक सहभागातून हा उपक्रम सुरू केला त्यामुळे अनेक बालके कुपोषण मुक्त झाली तसेच हा उपक्रम पुढेही सुरू राहणार आहे.
दरम्यान लोक सहभागातून वीस वर्षापासून कुपोषण कमी करण्यासाठी हा उपक्रम सुरू असून अनेक बालके साधारण श्रेणीत आली असल्याचे गौरवमूर्ति संजय शहापूरकर यांनी सांगितले. याप्रसंगी अध्यक्ष नितीन देशमुख, उपाध्यक्ष नंदकुमार काळे व सागर पाटील, सचिव विनोद लोहाडे, कोषाध्यक्ष निखिल सारडा, सहसचिव किरण जोशी व सुनील देशमुख, संघटन सचिव अमान उल्हाह सय्यद, फार्मसी कौन्सिल चे मनोहर कोरे,दिलीप जैन,शेखर गाडे, दिनेश पंडित, अमोल पाखरे छत्रपती संभाजीनगर जिल्हा केमिस्टंट रजिस्ट असोसिएशनचे कार्यकारणी सदस्य तसेच जिल्ह्यातील विविध भागातील औषधी विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments