राजुरी वार्ताहर - वधू वराच्या हस्ते मान्यवरांना वृक्ष वाटप करून रामपूर येथील लोखंडे परिवाराकडून अनोख्या पद्धतीने 100 वृक्ष वाटून सामाजिक संदेश देत शुभमंगल विवाह केला संपन्न...!
रामपूर येथील सामाजिक कार्यकर्ते प्राचार्य अनिल लोखंडे यांचे चि.सिद्धार्थ व चि सौ कां. वैष्णवी या उभयतांचा शुभमंगल विवाह सोहळा उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात संपन्न झाला. यावेळी वरपिता डॉ.अनिल किसन लोखंडे मुख्याध्यापक व (सचिव - निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महा.राज्य.) रामपूर ,ता राहुरी व वधुपिता बापूसाहेब महादू डोखे माळेगाव हवेली यांच्या दोन्ही परिवारांच्या वतीनें प्रगतशील शेतकरी, कृषिमित्र ज्ञानदेवराव आनंदा लोखंडे मा.चेअरमन रामपूर वि. का.सोसायटी यांनी सर्व उपस्थितीतांचे आभार मानले.
आणि दोन्ही परिवाराच्या वतीने सत्काराला व अनावश्यक पारंपारिक रूढी परंपरांना फाटा व छेद देवुन चि.सिद्धार्थ आणि चि सौ कां.वैष्णवी यांच्या विवाह प्रित्यर्थ गुहा ,तांभेरे येथील अनाथांची माय आदरणीय सिंधूताई सपकाळ प्रणित गंगाधर बाबा छात्रालय अनाथालयातील विद्यार्थ्यांना स्नेह व प्रिती भोजनाप्रित्यर्थ 5001/-रुपये देणगी सुपूर्त करण्यात आली., रामपूर येथील श्री रामेश्वर महादेव मंदिर जीर्णोद्धारासाठी 5001/-रुपये व संतकवी महिपती महाराज देवस्थान ट्रस्ट ताहाराबाद मंदीर कलशारोहनासाठी 5001/-रुपये देणगी सुपूर्द करण्यात आली. आणि अनोख्या पद्धतीने सामाजिक बांधिलकीची भावना जपत वधुवरांच्या शुभहस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिनिधिक स्वरूपात काही उपस्थित मान्यवरांना सध्याच्या कडक उन्हाळ्यात भरपूर सावली व गोड फळझाडांच्या फळांची चव घेता यावी म्हणून भरपूर ऑक्सीजन युक्त 100 वृक्षांचे वाटप करण्यात आले. या विवाह सोहळ्यास विविध संस्थांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी , गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी,केंद्रप्रमुख , राजकीय, सामाजिक क्षेत्रातील, पारमार्थिक क्षेत्रातील अनेक महंत ,गुरुवर्य मंडळीनी पत्रकार उपस्थित राहून व अनेक मान्यवरांनी शुभ संदेश पाठवून या नव दांपत्यास वैवाहिक जीवनात पदार्पण करीत असताना सुखमय,आनंदमय उज्वल भविष्यासाठी शुभाशीर्वाद दिलेत. याप्रसंगी ह भ प रामदास पा.देठे- मा.संचालक प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था प्रवरानगर सोपानकाका शिरसाठ मा. ज्येष्ठ संचालक राहुरी कारखाना , सुप्रसिद्ध उद्योजक व कृषिभूषण राजेंद्र शेठ कुंकूलोळ , जालिंदर पा कुऱ्हे मा.व्हाईस चेअरमन अशोक कारखाना , बाळासाहेब चौधरी पाटील.सरपंच नेवासा, प्राध्यापक दिगंबर सिरसाठ - मा.सभापती पंचायत समिती राहुरी विश्वासराव कडू पाटील- मा.व्हा.चेअरमन प.डॉ.विखे पाटील साखर कारखाना, वसंतराव डुक्रे संचालक प्रवरा सह बँक , राजेंद्र पा अनाप, साहेबराव पा अनाप , दत्तात्रय पा अनाप, मा.प्राचार्य मधुकरराव अनाप म.फुले कनिष्ट महाविद्यालय प्रवरानगर, पा दीपक पाटील शिरसाठ -मा संचालक पा डॉ.विखे पा कारखाना, मा सोपानराव शिरसाठ संचालक पा.डॉ.विखे कारखाना, कोल्हार खु चे पो पाटील श्री सुभाषराव शिरसाठ , सोनगाव येथील सामाजिक कार्यकर्ते - डॉ सुभाषराव शिंदे पा , भाऊसाहेब पा अंत्रे- तंटामुक्ती अध्यक्ष सोनगाव, पालकमंत्री नामदार डॉ राधाकृष्ण विखे पाटील परिवाराच्या वतीने सौआशाताई व डॉ.अनिल लोखंडे यांचा सन्मान केलेले आणि विखे पाटील परिवाराच्या शुभेच्छांसह उपस्थित स्वीय सचिव एम बी अंत्रे पा. ह भ प आण्णा महाराज लोंढे,ह भ प शांताराम महाराज जोरी मा.संचालक प्रवरा विखे पा कारखाना, ह भ प बाळासाहेब कुळधरण महाराज, संजय कळमकर, दीपक शेठ जेजुरकर, भिमराज पा बुधे,दैनिक सकाळचे पत्रकार सुहास वैद्य ,सार्वमतचे पत्रकार विजयराव बोडखे ,श्री विनोद मोरे ,कोंडीराम नेहे ,आंबी खालसा ,संगमनेर येथील आजी सरपंच बाळासाहेब ढोले पाटील , मा.सरपंच बाळासाहेब गाडेकर ,निसर्ग वा सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्याध्यक्ष प्रमोददादा मोरे , उपाध्यक्ष प्रकाश केदारी ,संघटक प्रा.डॉ.शरद दुधाट सर , श्री हरिभाऊ शिंदे, दिलीप गायकवाड सर, सोनई महाविदयालयाचे प्राचार्य डॉ.शंकराराव लावरे , म.फुले माध्य व कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य अरुण तुपविहिरे सर ,स्वामी सहजानंद भरती शिक्षण शास्त्र महाविद्यालय मा.प्राचार्य डॉ.शंकराराव गागरे सर,प्रवरा व्रमीन शिक्षण संस्थेचे संचालक श्री शशिकांत पा घोलप , सामाजिक कार्यकर्ते राजू भाऊ शेटे, किरण पा कडू , रामपूर गाव सरपंच सौ मीनाताई मोरे ,उपसरपंच राहुल पाटील साबळे , प्रवरा बँक संचालक अनिल पा अंत्रे ,मा.संचालक प्रवरा कारखाना श्री अशोकराव गाडेकर , गणेश साखर कारखाना संचालक ज्ञानदेव माऊली पा चोळके, मच्छिन्द्र पा पावडे ज्येष्ठ संचालक प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, उद्योजक श्रीकांत पुंड, राजूमामा शिंदे , मुळा प्रवरा संचालक भास्करराव खर्डे पाटील भारत पाटील खर्डे, प्रसिद्ध व्यापारी नितीन मैड ,उद्योजक राधाकृष्ण पा.जाधव गोरक्षनाथ पा डोखे ,नारायण पा डोखे, अनिल पा डोखे, साहेबराव अनाप - मा चेअरमन प्राथ जिल्हा शिक्षक बँक, दत्तात्रय पा डोखे, उद्योजक शिवाजीराव अभंग, अशोकराव आगरकर , श्री गोविंद पा डोखे, मा.प्राध्यापक.सुरेश पा शिरसाठ, आदी मान्यवर वा नातेवाईक , मित्र परिवार , प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे मा. शिक्षण संचालक डॉ.आण्णासाहेब तांबे सर, राहाता ता.मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य दिपक डेंगळे सर, प्रवरा पब्लिक स्कुलचे प्राचार्य बाळासाहेब अंबाडे सर, प्रवरा संस्थेतील पदाधिकारी, आजी , माजी प्राचार्य,मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षिका ,शिक्षकेत्तर वृंद मोठया संख्येने उपस्थित होते.
0 Comments