तालुक्यातील कंकराळा येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त अभिवादन-



दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.14- हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, पराक्रमी योद्धा आणि राष्ट्राभिमानाचे प्रतीक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील कंकराळा येथील मारोती मंदिरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. 

यावेळी विशाल पाटील, गणेश मचे, मोतीलाल घुसिंगे, आकाश मग, संदीप पाटील, विशाल उबाळे, अनिल पाटील, नरेश पाटील, भावेश कदम, शांताराम पाटील, भोला उबाळे, पवन पाटील, यश पाटील,रोशन उबाळे, आदित्य पाटील, गणेश साबळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments