लोहगाव (वार्ताहर):
एस. एस. सी. बोर्ड परीक्षा २०२५ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून रयत शिक्षण संस्थेच्या प्रवरानगर येथील महात्मा गांधी विद्यालयाचा सेमी गुरुकुल निकाल 100% , मराठी माध्यम निकाल ९२.१५ तर कन्या विद्यालय चा निकाल ९४.०२ टक्के लागला आहे.
विद्यालयातील मुले विभागात आहेर जगदीश विलास ९३ टक्के प्रथम, वाकचौरे आदित्य महेश ९१ टक्के द्वितीय तर काळे युवराज रामदास ९० टक्के गुण मिळवून तृतीय आले आहेत. तर कन्या विभागातील भालेराव तनुजा शरद ९४.६० टक्के प्रथम, नन्नावरे गौरी मल्हारी ९०.८० टक्के द्वितीय तर भोंगळे दिव्या धनंजय ८८.४० टक्के गुण मिळवून तृतीय आली आहेत.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल रावसाहेब म्हस्के पाटील , अरुण कडू पाटील, एकनाथराव घोगरे पाटील, माजी प्राचार्य बी.जी. आंधळे, माजी प्राचार्य काकडे ए एस., प्राचार्य विनायक मेथवडे, मुख्याध्यापिका नलिनी जाधव, उपप्राचार्य अलका आहेर, उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे, पर्यवेक्षिका संगीता सांगळे, संजय ठाकरे, माधुरी वडघुले , डॉ.शरद दुधाट यांच्यासह सर्व समिती सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, पालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.
0 Comments