गोगलगांव विद्यालयाचा निकाल ९१.१७ टक्के लागला.

विजय बोडखे 

राजुरी वार्ताहर खासदार बाळासाहेब विखे पाटील विद्यालय गोगलगावं या विद्यालयाचा निकाल ९१.१७ टक्के निकाल लागला आहे.

             खासदार बाळासाहेब विखे पाटील विद्यालय गोगलगावं तालुका राहाता या विद्यालयाचा दहावीचा निकाल ९१.१७ टक्के लागला असल्याची माहिती मुख्याध्यापक के. एम. म्हस्के यांनी दिली. 
दहावीच्या परीक्षेत एकुण ३४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ३१ विद्यार्थी पास झाले आहेत. 4 विद्यार्थ्यां विशेष प्राविण्य मिळवले आहे 11 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून 11 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत व 5 विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले असून कु . घोडे रोहिणी शिवाजी ८२.४ टक्के गुण मिळवत प्रथम, कु सातकर वैष्णवी गोकुळ ७९ टक्के गुण मिळवत द्वितीय तर सातकर प्रथमेश संजय ७८ टक्के गुण मिळवत तृतीय आला आहे.
सर्व गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष राज्याचे जलसपदामंत्री मा. नामदार डॉ. राधाकृष्ण विखेपाटील, जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील, मा. खासदार डॉ. सुजय विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुश्मिता विखे पाटील, सह सचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद हिरेमठ , संचालक प्रदीप दिघे , शिक्षण संचालिका लीलावती सरोदे, पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे संचालक रामप्रसाद मगर स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष, सरपंच, गोगलगावं ग्रामस्थ, मुख्यध्यापक के.एम.म्हस्के, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments