सोयगाव तालुक्यातील उच्च माध्यमिक शाळांत परीक्षेचा निकाल 93.32 टक्के,बाबुरावजी काळे मराठी शाळेचा निकाल शंभर टक्के,शाळेची ज्योती गव्हांडे तालुक्यात अव्वल---



दिलीप शिंदे
सोयगाव दि.16- सोयगाव तालुक्यातील इयत्ता दहावीच्या परीक्षेत एकूण एक हजार 543  विद्यार्थ्यांपैकी एक हजार 440 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन बाबुरावजी काळे मराठी शाळा सोयगाव चा शंभर टक्के निकाल जाहीर झाला असून बाबुरावजी काळे मराठी शाळेची विद्यार्थिनी ज्योती ईश्वर गव्हांडे ही 94.20  टक्के गुण घेत तालुक्यात अव्वल आहे दरम्यान तालुक्यातील एकूण 25 शाळांपैकी बाबुरावजी काळे मराठी स्कुल सोयगाव,माध्यमिक विद्यालय वनगाव,माध्यमिक विद्यालय जामठी,आश्रम शाळा बनोटी, प्रगती उर्दू हायस्कूल सोयगाव या पाच शाळांचे निकाल शंभर टक्के जाहीर झाले आहे तर तालुक्यातील 559 विद्यार्थी जिल्ह्या श्रेणीत,377 विद्यार्थी प्रथम श्रेणीत 267 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत व 37 विद्यार्थी सामान्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे .
माध्यमिक शाळांत परीक्षेत कै. बाबुरावजी काळे मराठी स्कूलचे 27  पैकी 27 विद्यार्थी  उत्तीर्ण झाले असून या शाळेची ज्योती ईश्वर गव्हांडे ही 94.20 टक्के  गुण मिळवून प्रथम, रोहन रत्नप्रदीप शिरसाट हा 92.40  टक्के  गुण मिळवून द्वितीय आणि भाग्यश्री राजेंद्र बाविस्कर ही 91 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. शाळेच्या या यशाबद्दल शिवज्योती शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा सौ. जोतीताई काळे, सचिव देविना काळे - भटकर, संचालक . शिवदीप काळे,सुनयना शिवदीप काळे, संस्था प्रतिनिधी प्रा.कमलेश काळे मुख्याध्यापक निलेश पाटील,ज्ञानेश्वर एलिस, सागर घाटे यांनी अभिनंदन केले.जरंडी येथील महात्मा फुले विद्यालयाचा निकाल 89 टक्के जाहीर झाला आहे या शाळेतील सतीश गोविंद राठोड याने 92.20 टक्के गुण मिळवीत तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळविला आहे रोहन जाधव 89.20  टक्के तर तेजस्विनी राठोड हिने 88 ,टक्के गुण मिळवीत यश संपादन केले महात्मा फुले विद्यालयाचे अध्यक्ष राजीव माळी यांच्या हस्ते सतीश राठोड याचा सत्कार करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक सुभाष महाजन, प्रल्हाद महाजन, श्रीराम पाटील,अमृत राठोड, उमेश राजहंस, दिलीप पाटील,लाला वाघ,उत्तम गवळे आदीं उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments