दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.15- सोयगाव तालुक्यात सुरू असलेल्या गौनखनिज चोरटी वाहतुकीला अद्यापही आळा घालण्यास गौनखनिज भरारी पथकाला यश आलेले नाही.
भरारी पथक कागदावरच असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
तहसीलदार व निवासी तहसीलदार स्थानिक ठिकाणी राहात नसल्याने पथकाच्या कारभारावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.मात्र माल महसुलचा व ताव पोलीस मारीत असल्याने गौनखनिज वाहतुकीला आळा बसला नाही.
यामुळे शासनाचा गेल्या वर्षभरापासून कोट्यवधींच्या शासनाच्या महसूलावर डल्ला मारीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल खाते असून देखील गौनखनिजाच्या चोरटी वाहतुकीला आळा घालण्यास प्रशासनाला अपयश आले आहे. दरम्यान रात्री बेरात्री जेसीबीच्या साहाय्याने गौनखनिज उत्खनन करून ट्रॅक्टरद्वारे वाहतूक केली जात आहे.जास्त उत्पन्न मिळावे या हेतूने ट्रॅक्टर चालक भरधाव वेगाने ट्रॅक्टर चालवीत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गौनखनिज माफिया शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून सर्रास चोरटी वाहतूक करीत आहे.निवासी तहसीलदार सोयगाव येथे राहत नसल्याने महसुलचे भरारी पथक कागदावरच असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भरारी पथक नियुक्ती करण्यात आले तेंव्हा पासून भरारी पथकाकडून एका ही जेसीबी, ट्रॅक्टर व वाळू डंपर वर कारवाई झाली नसल्याने पथकाच्या कारभारावर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे. दिवस,रात्री बेरात्री तालुक्यात मुरूम व वाळू या गौनखनिज चोरटी वाहतूक सुरू असल्याने महसूल पथकाने कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी चोरटी वाहतूक करून वाळूचे साठे पडलेले आहेत. रात्री चोरटी वाळू वाहतूक करणारे डंपर सुरू असतात. महसूल विभाग झोपेत आहे की झोपेचे सोंग घेतल्याचे सोंग करीत आहे. महसुला च्या मालावर मात्र सोयगाव पोलीस ताव मारीत असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.(सहयोगी पत्रकार दिलीप शिंदे सोयगाव)
0 Comments