टाकळीभान प्रतिनिधी:-. २० फेब्रुवारी पासुन ओरीसा येथे सुरू होत असलेल्या नॅशनल चॅम्पीयन कबड्डी स्पर्धेसाठी पुरुष गटाची महाराष्ट्र राज्याच्या संघाची घोषणा नुकतीच झाली आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या संघात नगर जिह्याचे तीन खेळांडूची निवड झाली आहे त्यात टाकळीभानचा उत्कृष्ट प्रो कबड्डी लीग स्टार खेळाडू शिवम अनिल पटारे याची निवड झाली असून तसेच भेंडा येथील शंकर गदई दहेगावनेचा संभाजी वाबळे यांची निवड झाली आहे.
प्रो कबड्डी सिजन १० मध्ये शिवमने हरीयाना टिलर्स संघाकडून खेळतांनी त्याने आपल्या उत्कृष्ट चढायांच्या जोरावर फायनल प्रो कबड्डी सिजन ११ मध्ये त्याने हरियाना टिलर्स संघाकडून खेळताना आपल्या अष्टपैलू खेळाने संघाला सुवर्ण पदक मिळवून दिले होते व सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती. या खेळाडूंच्या निवडीबद्दल अहमदनगर जिल्हा कबड्डी हौशी असोसिएशनचे पदाधिकारी व समस्त कबड्डी क्रीडाप्रेमी यांनी महाराष्ट्र संघात निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे व त्यांच्या भावी कामगिरीस शुभेच्छा दिल्या आहेत.
0 Comments