दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.15- सोयगाव तालुक्यातील बनोटी तांडा येथे संत शिरोमणी सेवालाल महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान बनोटी तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत सदस्या हिराबाई चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले. त्यानंतर शाळेतील विध्यार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात आली. बॅन्ड, डीजे,ढोल ताशा न लावता या खर्चास तिलांजली देत नामदेव यमजी प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष मलखान चव्हाण यांनी ए के ईंग्लिश स्कुल शाळेच्या कीरकोळ दुरुस्ती साठी अकरा हजार रुपये देणगी देत नवीन पायंडा पाडीत साद्या पद्धतीने संत सेवालाल महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बंजारा समाज एकजूट,समाजाची प्रगती आणि शाळेचा विकास यावर चव्हाण यांनी मनोगतातून विचार व्यक्त केले.दरम्यान यावेळी विद्यार्थ्यांनी भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरण केले.उपस्थितांनी विध्यार्थ्यांना बक्षिसे देऊन त्यांचे कौतुक केले. कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रविण चव्हाण,गावातील ज्येष्ठ नागरिक रामदास जाधव,एकनाथ जाधव,भगवान राठोड, परसराम चव्हाण,राजाराम पवार,शरद राठोड,अंकुश राठोड,अर्जुन जाधव, नागरिकांसह,शाळेचे मुख्याध्यापक प्रेमसिंग राठोड शिक्षक योगेश पाटील अंगणवाडी सेविका निर्मला राठोड,मदतनीस रेखाबाई बनसोडे आदींची उपस्थित होती.(सहयोगी पत्रकार दिलीप शिंदे सोयगाव)
0 Comments