महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग; दोघे ताब्यात





टाकळीभान : श्रीरामपूर येथील एका नामांकित महाविद्यालयातील तरुणीला बळजबरी गाडीवर बसून नेऊन तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तणूक केली व पुन्हा पीडितेला घरी नेऊन सोडत झाल्या प्रकाराबद्दल कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. 

याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. याबाबतची पोलीस सूत्राकडून समजलेली माहिती अशी की, शहरातील एका नामांकित महाविद्यालयाची अल्पवयीन मुलगी सकाळी महाविद्यालयात आली असता दुपारी आरोपी अक्षय मते व सोमनाथ कुसळकर राहणार टाकळीभान या दोघांनी तिला बळजबरी गाडीवर बसून टाकळीभान येथे सोमनाथ कुसळकर यांच्या घरी नेले त्या ठिकाणी त्यांनी मुली बरोबर गैरवर्तन करत लज्जा उत्पन्न होईल असा प्रकार केला व पुन्हा सोमनाथ याने पीडितेला घरी सोडल्यानंतर झाल्या प्रकाराबद्दल कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. 


याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात पोस्को, विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीरामपूर तालुक्याचे पीआय दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश डौले करत आहेत.



Post a Comment

0 Comments