लोहगाव (वार्ताहर):बांधकाम कामगार यांना तूटपुंजा पगारात अतिशय कष्टाचे काम करत असताना स्वतः कडे व कुटुंबाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते कामगारांचे व त्यांच्या कुटुंबाचे आरोग्य नेहमी निरोगी असावे यासाठी शासनाकडून त्यांना मोफत आरोग्य योजनेचा लाभ मिळावा यासाठी संघटनेमार्फत मागणी करणार असल्याचे प्रतिपादन श्रीराम असंघटित बांधकामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश छल्लारे यांनी बांधकाम कामगारांसाठी आयोजित मोफत आरोग्य शिबिर कार्यक्रम प्रसंगी केले.
लोकनेते मा. आ. भानुदास मुरकुटे व युवा नेते अशोकचे संचालक निरज मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली वडाळामहादेव येथे शुक्रवार दि. ६ फेब्रुवारी रोजी श्रीराम असंघटीत बांधकाम कामगार संघटना महाराष्ट्र राज्य व बांधकाम कल्याणकारी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने असंघटीत बांधकाम कामगारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी गणेश छल्लारे बोलत होते. कार्यक्रम प्रसंगी अशोकचे संचालक रामभाऊ कासार, वडाळा महादेव सोसायटीचे चेअरमन धनंजय पवार, बाळासाहेब कासार, अनिल पवार, मा. उपसरपंच सुनील कुदळे , व्हा. चेअरमन बाबासाहेब कुदळे, मनोज गवळी,रघुनाथ उघडे, विजय राठोड,लक्ष्मण उघडे, बाबासाहेब पवार, बापूसाहेब गायकवाड, बापू पवार, बाबासाहेब अभंग, शरद पवार आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी श्रीराम असंघटित बांधकाम कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश छल्लारे, सचिव दीपक नवगिरे व मान्यवरांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी गणेश छल्लारे यांनी कामगारांना सर्व शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन केले व बांधकाम कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील व कटिबद्ध असल्याचे सांगितले. श्रीरामपूर तालुक्यातील व वडाळा महादेव परिसरातील अनेक बांधकाम कामगारांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.
शिबिर प्रसंगी उपस्थित डॉक्टर व त्यांची टीम यांनी शिबिरासाठी चांगली सेवा दिली. कार्यक्रम प्रसंगी विलास गायकवाड,असलम सय्यद, करीम सय्यद,प्रमिला धनवटे ,लता कुसलकर, सासवती कुस्लकर, मंगल धनवटे,वैशाली धनवटे,निर्मला धनवटे, निर्मला जाधव, शीतल धनवटे, नंदू राऊत , प्रवीण राऊत, जालिंदर परदेशी , राहुल राऊत , संभाजी पवार,अशोक जाधव आदी सह कामगार बांधव, माता -भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments