मोफत श्रवण यंत्र वाटप शिबिराचा शिर्डीत अनेक रुग्णांनी घेतला लाभ!

शिर्डी ( प्रतिनिधी)
 श्री साई संस्थान व भगवान महावीर विकलांग सहायता समिती मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शिर्डीत साईनाथ हॉस्पिटल येथे  मोफत श्रवण यंत्र वाटप शिबिर गुरुवार व शुक्रवार या दोन दिवशी आयोजित करण्यात आले होते.

 या शिबिरात अनेक रुग्ण आले होते. मात्र गुरुवारी नियोजनाचा अभाव असल्यामुळे रुग्णांचे हाल झाले. तसे वृत्त येताच या वृत्ताची दखल घेत साई संस्थान व शिबिर आयोजकांनी तात्काळ शिबिराच्या ठिकाणी सर्व व्यवस्था करत सुधारणा केली. त्यामुळे येथे आलेल्या रुग्णांची  शुक्रवारी चांगली व्यवस्था झाली. अनेक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. वृत्तामुळे शिबिर आयोजकांनी सुधारणा करत हे शिबिर यशस्वी केले. याबद्दल रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक यांनी शिबिर आयोजकांना धन्यवाद दिले आहेत.


Post a Comment

0 Comments