शांती समाधान आनंद अंतरंगात! मात्र त्यासाठी ध्यानाची आवश्यकता --आचार्य रजनीश यांचे बंधू स्वामी शैलेंद्र सरस्वती

शिर्डी (प्रतिनिधी) प्रत्येकाच्या अंतरंगात समाधान शांती आहे. मात्र आपण ती इतरत्र धुडण्यांचा प्रयत्न करतो. पण ती मिळत नाही. त्यासाठी ध्यान करून समाधान शांती आनंद मिळवता येतो. असा हा संदेश आपण सर्वांनाच देत आलो आहे .आजही देत आहे. असे मत जगविख्यात सद्गुरु आचार्य रजनीश ओशो यांचे बंधू स्वामी शैलेंद्र सरस्वती यांनी व्यक्त केले.

  स्वामी शैलेंद्र सरस्वती हे ध्यान शिबिरासाठी शिर्डी येथे आले आहेत. यावेळी ते म्हणाले की, ध्यानामुळे आत्मिक आनंद समाधान मिळते. म्हणूनच अशी ध्यान शिबिरे आयोजित केली जातात. देशात सुमारे साडेतीनशे व विदेशातही तेवढेच साडेतीनशे असे सुमारे सातशे ध्यान केंद्र असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आचार्य रजनीश सुद्धा श्री साईबाबांना मानत होते. ते अनेकदा साईबाबांविषयी चर्चा करायचे. मी सुद्धा यापूर्वी श्री साईबाबांच्या दर्शनासाठी आलो होतो.

 आज शिबिरासाठी आलो असलो तरी साईबाबांचे दर्शन घेणार आहे. साईबाबांच्या दर्शनामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते. असे स्वामी शैलेंद्र सरस्वती यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments