दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.07 - पारशी धर्मात मयत व्यक्तींवर टॉवर ऑफ पीस या त्यांच्या अंत्यसंस्कार केंद्रात वेगळ्या पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातात. मृत व्यक्तीचे शरीर कापडाने झाकून टॉवर वर ठेवले जाते. त्या देहाच्या वासाने गिधाडे त्या ठिकाणी सवयीने बरोबर येतात व पूर्ण मृतदेहाची विल्हेवाट लावतात. यास स्काय ब्युरिड म्हटले जाते. मृत्यू नंतर निसर्गाच्या कामात आपण यावे व वायु चे प्रदूषण होऊ नये म्हणून पारसी लोकांत ही पद्धती आहे.
मात्र या 40 वर्षात भारतात व जगात गिधाडांची संख्या 98 टक्के घटली आहे.केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या नोंदीनुसार देशात 1980 मध्ये 4 कोटी गिधाडे होती ती आता केवळ 5 ते 6 हजार इतकीच उरली असून त्यांचे ही आयुष्यमान सरासरी 5 ते 6 वर्ष इतके आहे. गिधाडे नष्ट झाल्याने पर्यावरणातील "स्वछता" थांबली आहे. गिधाडे मृत जनावरांचेचं मांस खातात. हे मृत प्राणी खाऊन ते निसर्गाची स्वच्छता राखतात. नसता रोगराई पसरली असती.नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या "अमेरिकन एकोनॉमिक्स रिव्ह्यू" नुसार भारतात 2000 ते 2005 दरम्यान देशात दरवर्षी 5 लाख लोकं गिधाडे नसल्याने विविध मृत प्राण्यांमुळे पसरलेल्या रोगराई मुळे मृत्यू झाला व 58 हजार कोटी वैद्यक उपचार व इतर बाबींवर देशाचे नुकसान झाले. गिधाडे का धोक्यात आली- गाई म्हशी गुरांना दुखापत झाली कि सर्रास डायक्लोफेनॅक व केटोप्रोफेन, निमेसूलाइड, असेक्लोफेनाक, फ्लूनाक्झीण हे इंजेक्शन व गोळी दिली जाते. सदर औषध जनावरांना दिले असता ते त्यांच्या शरीरात शेवट पर्यंत रक्त, मांस, यकृत यात शिल्लक राहते.(resids ). सदर जनावरे मृत झाले कि त्यांचे मांस गिधाडे खातात व त्या मासांसोबत या हानिकारक औषधांचा अंश गिधाडांच्या शरीरात जातो व त्यांचे मूत्रपिंड यामुळे निकामी होऊन त्यांना लवकर मृत्यू येतो. सदर औषधे व्हेटरनरी युज म्हणून जरी बंदी असली तरी माणसामधील "डायक्लोफेनॅक" व केटोप्रोफेन ई.औषध प्राण्यांना दिले जाते ही गंभीर बाब आहे.गिधाडे नामशेष होण्याचे दुसरे महत्वाचं कारण म्हणजे वनातील हरीन, मोर,व इतर बहुतेक महत्वाचे वन्यजीव आता वनवीभाग हे वन्यजीव मृत झाले कि त्यांना पुरून टाकते. वन्यजीव अवयव तस्करी होऊ नये म्हणून हे केले जाते. हे प्राणी जमिनीत पुरल्याने ही गिधाडांना अन्न मिळेनासे झाले. गिधाडे उंच डोंगरावर व शिखरावरील उंच झाडांवर घरटी बांधतात. डोंगर, उंच झाडे हा अधिवास आता मानवी अतिक्रमनामुळे नाश पावला आहे असे डॉ. संतोष पाटील यांनी स्पष्ट केले. प्राण्यांमध्ये सुरक्षित वेदना शामक-घातक वेदना शामक रासायनिक औषधां ऐवजी सलाकी (बोस्वेलिया सराटा )या गुग्गुळ युक्त आयुर्वेदिक औषधाचा उपयोग केला तर ते गिधाडांना नुकसान कारक ठरणार नाही, यावर माझे संशोधन सुरु आहे, पुढील वर्षात याचे क्लिनिकल स्टडी जगापुढे येतील असे डॉ. पाटील यांनी सांगितले.दरम्यान सिल्लोड येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या आर्ट, सायंस च्या बॉटनी शाखेच्या वतीने विद्यार्थ्यांकरिता उपप्राचार्य प्रा डॉ. जीवन मोरे यांच्या अध्यक्षतेखाली "सेव्ह नेचर, सेव्ह व्हल्चर ". या विषयावर डॉ. प्रा.सुनीता जावळे, प्रा. डॉ. जगदीश सावदेकर यांनी या "ग्रीन टॉक "चे आयोजन केले होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. बदर यांनी केले तर आभार प्रा संजय जोढी यांनी मानले.यावेळी प्रा. एकनाथ जंजाळ, प्रा. शीतल कांबळे व विद्यार्थी उपस्थित होते. ग्रामीण भागातील , शेतकरी कुटुंबातील विदयार्थ्यांनी आपल्या पाळीव जनावरांना सदर औषधे वापरली जाणार नाही म्हणून जनजागृतीची मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
0 Comments