दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.07 --अवैधरीत्या वाळू वाहतूक करतांना पकडण्यात आलेल्या डंपर ला सोयगाव पोलिसांनी जप्त करून सोयगाव पोलीस ठाण्यात लावले होते.त्याच डंपर मधील वाळू पोलीस ठाण्यातच डंपर च्या मागे एक ते दीड ब्रास वाळू खाली उभरण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार दि.06 गुरुवारी सोयगाव पोलीस ठाण्यात उघडकीस आल्याने शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. वाळू कुणी उभरली कोणत्या कारणासाठी उभरली असे अनेक प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केले जात असल्यांर सोयगाव पोलिसांच्या कर्तव्यावर च नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी,भडगाव तालुक्यातून चोरीच्या उद्देशाने वाळू ची वाहतूक करणारे ढपंर दि.22 बुधवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास रात्रीच्या गस्तीवर असलेल्या सोयगाव पोलिसांनी एम एच 18 बीजी 5277 या वाळू डंपर ला रंगेहाथ पकडून सोयगाव पोलीस ठाण्यात लावण्यात आले आहे. अवैधरीत्या वाळू वाहतूक करतांना पकडण्यात आलेल्या वाळू डंपर ची माहिती तात्काळ महसूल व प्रादेशिक परिवहन विभागाला देणे गरजेचे असतांना देखील सोयगाव पोलिसांनी तब्बल दहा ते बारा दिवसानी महसूल व प्रादेशिक परिवहन विभागाला सोयगाव पोलिसांनी कळविल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. जप्त करण्यात आलेले हे डंपर सोयगाव पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीच्या आवारात उभे असतांना या डंपर मधील एक ते दीड ब्रास वाळू खाली उभारण्यात आली. वाळू कुणी खाली उभारली, वाळू खाली उभारण्यास कुणी मदत केली, डंपर चे मागील फालके कुणी उघडले, सीसीटीव्ही असतांना हा प्रकार कसा घडला यामुळे पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दि.06 गुरुवारी सोयगाव पोलीस ठाण्यात भेट देऊन साठ हजार रु दंड ठोठावल्याची माहिती प्रादेशिक परिवहन च्या सूत्रांनी दिली. महसूल विभागाकडून अद्यापही डंपर चा पंचनामा करण्यात आलेला नाही. व डंपर मालकास महसुल कडून जास्त दंड आकारला जावू नये यासाठी डंपर मध्ये असलेल्या वाळू पैकी एक ते दीड ब्रास वाळू डंपर च्या मागेच खाली उभरण्यात आली असल्याने गौनखनिज माफियांना कोण मदत करीत आहे. पोलीस ठाण्याच्या आवारात उभ्या असलेल्या डंपर मधील वाळू खाली उभरण्यात आल्याने पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. सोयगाव पोलीस ठाणेच असुरक्षित असल्याने नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा रंगली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक म्हणवून घेणारे विनयकुमार राठोड हे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करणार की पाठराखण करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
0 Comments