शिर्डी (प्रतिनिधी) राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील प्रसिद्ध सराफ व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते श्री संजय दहिवाळ यांचा आज एक जानेवारी 2025 बुधवार रोजी वाढदिवस असून त्यांचेवर वाढदिवसानिमित्त अनेक क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांना प्रत्यक्ष भेटून तसेच सोशल मीडियावर व मोबाईलवर त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.
आयुष्य हा एक सुंदर प्रवास आहे, एक नदीसारखा जो सतत वाहत असतो. डोंगरदऱ्यांच्या अडचणीतून मार्ग काढत असतो.प्रत्येक दिवस नवा अनुभव,आंनद घेऊन येतोच, पण वाढदिवस हा एक विशेष दिवस असतो. कि,तो दिवस आनंदाबरोबर, खुशी आणि नवीन आशा घेऊन येतो. नवीन संकल्प घेऊन येतो.
वाढदिवस म्हणजे आपल्या प्रियजनांसोबत एकत्र येऊन त्यांचा खास दिवस साजरा करण्याचा, आनंद आणि उत्सव अनुभवण्याचा दिवस असतो. हा दिवस जीवनातील यश, स्वप्ने आणि प्रेम साजरे करण्याची एक खास संधी देतो. व सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारत व त्यामुळे मिळणारी ऊर्जा अंगीकारत पुढील वर्षाच्या नवीन संकल्पा साठी सज्ज होणारा हा दिवस असतो. म्हणूनच या वाढ दिवसाला प्रत्येकाच्या जीवनातील आनंददायी दिवस संबोधला जातो. अशा या आनंददायी वाढदिवसी संजू भाऊ यांना सर्व क्षेत्रातून शुभेच्छा देण्यात येत आहेत.
श्री संजय विठ्ठलराव दहिवाळ हे सावळीविहीर बुद्रुक ,तालुका राहाता जिल्हा अहिल्यानगर येथील एक प्रसिद्ध असे सराफ व्यापारी असून ते आपल्या व्यवसाया बरोबरच सामाजिक कार्यातही नेहमी सक्रिय असतात. सामाजिक कार्याबरोबरच धार्मिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग असतो .मग श्री साईसतचरित्र पारायण असो, की परशुराम महाराज यात्रा असो की गणेश उत्सव ,नवरात्र उत्सव असो, त्यामध्ये त्यांचा खारीचा का होईना वाटा असतो . श्री साई सतचरित्र पारायणाच्या वेळी श्री साईबाबांच्या प्रतिमाला ते स्वतः हाताने आकर्षक असा पुष्पहार बनवून दररोज सात दिवस अर्पण करत असतात. तर ते सद्गुरू शंकर महाराजांचे निस्सीम भक्त असून दररोज आपल्या घरी ते सद्गुरू शंकर महाराजांच्या मूर्तीला स्वतः हाताने आकर्षक असा पुष्पहार बनवून अर्पण करत असतात. शालेय व महाविद्यालयीन जीवनात त्यांनी अनेकदा सावळी विहीर ते वणी सप्तशृंगी गड पदयात्रा तसेच सायकल यात्राही केलेली आहे. त्यांना क्रीडा क्षेत्रातही मोठी आवड आहे.ते उत्कृष्ट कबड्डीपटू असून शाळा व महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध ठिकाणी जिल्हा, राज्य पातळीवर, कबड्डी स्पर्धेमध्ये भाग घेऊन सांघिक पारितोषिके पटकावले आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण सावळविहीर बुद्रुक व महाविद्यालय शिक्षण कोपरगाव , नाशिक येथे झाल्यानंतर पदवीधर असताना नोकरीच्या मागे न लागता सराफी दुकान टाकून त्यामध्ये चांगले यश संपादन केले आहे. प्रमाणिकपणे आपला व्यवसाय करत असताना तसेच सामाजिक कार्य करत असताना आपले कुटुंबही सुसंस्कृत व सुशिक्षित असे केले आहे. आपल्या सुविध्य पत्नीचेही मोठे सहकार्य मिळत गेले.साथ राहिली.आपला मोठा मुलगा हर्षल त्याला चांगले उच्च शिक्षण व सुसंस्कार देऊन चांगले घडवले .तो आता अमेरिकेनंतर लंडन येथे उच्चपदावर नोकरी करत आहे. सूनबाई सुद्धा डॉक्टर आहेत. लहान मुलगा आशिष हा उच्च शिक्षण घेऊन पदवीधर झाला आहे. दहिवाळ कुटुंबामध्ये मोठे असल्यामुळे भाऊ-बहीण व कुटुंबातील सर्वांना चांगले संस्कार दिले आहेत. विशेष म्हणजे त्यांचा शांत संयमी व सर्वांमध्ये मिळून मिसळून राहण्याचा स्वभाव यामुळे ते सर्व परिचित आहेत. मोठा मित्रपरिवार राज्यात व परराज्यातही त्यांनी आपल्या वागणुकीमुळे मिळवला आहे. त्यामुळेच आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचेवर सर्व क्षेत्रातून ,मित्र परिवारातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दैनिक छत्रपती एक्सप्रेस परिवाराच्या वतीनेही संजू भाऊ ना जन्मदिनी खूप खूप शुभेच्छा! तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो आणि तुमच्या जीवनात अमूल्य प्रेम आणि आनंदाचा अनुभव मिळो. ! तुमचं जीवन अनंत सुख आणि प्रेमाने भरलेलं असो, आणि तुम्ही सदैव हसत आणि आनंदी राहो! वाढदिवसाच्या खूप खूप सदिच्छा आहेत व त्याचप्रमाणे नवीन वर्षाच्या ही खूप खूप शुभेच्छा आहेत.
0 Comments