नव वर्षदिनी भोजपुरी चित्रपटाचा प्रसिद्ध अभिनेता केसरी लाल यादव यांनी शिर्डीत घेतले साईबाबांचे दर्शन! संस्थांनच्या वतीने करण्यात आला सत्कार!

शिर्डी ( प्रतिनिधी) शिर्डीत श्री साईबाबांच्या दर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात व्हावी .या उद्देशाने अनेक  नेते ,अभिनेते व विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच मोठ्या संख्येने साईभक्त शिर्डीत येत असतात.

 त्याप्रमाणेच आज एक जानेवारी 2025 बुधवार रोजी नविन वर्षाचे औचित्‍यावर भोजपुरी चित्रपटाचे प्रसिद्ध अभिनेता केसरलाल यादव यांनी शिर्डीला भेट देऊन श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. साई दर्शनानंतर त्यांचा साई संस्थांनच्या वतीने शाल प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला. 

केसारीलाल यादव  एक भारतीय अभिनेता , गायक, नृत्यांगना आणि मॉडेल आहे. जो प्रामुख्याने भोजपुरी सिनेमात काम करतो .यादव यांनी 70 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेले आहे आणि 5000 हून अधिक गाण्यांमध्ये गायक म्हणून काम केले आहे. भोजपुरी व्यतिरिक्त त्यांनी हिंदी , अवधी आणि हरियाणवी भाषांमध्येही काम केले आहे . 2019 मध्ये, त्याने बिग बॉस 13 या रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला होता.

Post a Comment

0 Comments