नववर्षाच्या निमित्ताने साईभक्त श्रीमती बबीता टिकू व परिवारांच्या वतीने १३ लाख ३० हजार रुपये किंमतीचा नक्षीदार सोन्याचा हार साई चरणी अर्पण!

शिर्डी (प्रतिनिधी) संपूर्ण विश्वाला सर्वधर्मसमभावाची शिकवण देणाऱ्या आणि श्रद्धा सबुरीचा संदेश देणाऱ्या शिर्डीच्या श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भक्‍तांची श्रद्धा आहे. त्यामुळेच दररोज हजारो व सण उत्सव काळात लाखोच्या संख्येने साईभक्त शिर्डीला साई दर्शनासाठी येत असतात. व साईं वरील श्रद्धेपोटी भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. 
आज बुधवार दिनांक ०१ जानेवारी २०२५ रोजी नववर्षाच्‍या निमित्‍ताने मुळचे जम्‍मु काश्मिर येथील परंतू सध्‍या शिर्डी येथील रहिवाशी साईभक्‍त श्रीमती बबीता टिकू व परीवार यांनी श्री साईचरणी २०६ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सोन्‍याचा हार अर्पण केला याची किंमत १३ लाख ३० हजार ३४८  रुपये असून हा सुंदर नक्षीकाम असलेला हार साईबाबांच्या चरणी अर्पण करुन श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्‍याकडे सुपुर्द करण्‍यात आला. त्‍यानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने साईसंस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी श्रीमती बबीता टिकू व परिवार या देणगीदार साईभक्‍तांचा शाल व श्री साईबाबांची मुर्ती देवून सत्‍कार केला. यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहीदास माळी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments