लोहगाव ( प्रतिनिधी)
माणसाला तंबाखू, जर्दामुळे कॅन्सर होतो. प्रत्येक पुडीवर, पाकीट वर तंबाखू जर्दा खाने आरोग्यास अपायकारक आहे. असे लिहिलेले आहे. तंबाखूमुळे जर कॅन्सर होतो व गायीमुळे कॅन्सर सारखा आजार बरा होतो. त्यामुळे संगमनेर येथील मालपाणी उद्योग समूहाच्या कारखान्यात तंबाखू पुडीवर टाकलेले गाय नावाचे शब्द व गायीचे छायाचित्र कमी करण्यात यावे ,ते हटवण्यात यावे. यासाठी शासनाने त्वरित निर्णय घ्यावा. यासाठी आज बुधवार एक जानेवारी 2025 रोजी संगमनेर येथे उपोषणला बसलेले अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ओझर खुर्द येथील मच्छिंद्र रामा यादव यांना प्रांतअधिकारी यांच्या वतीने आपला निर्णय शासनाला त्वरित कळविण्यात येईल असे आश्वासन दिल्यामुळे हे उपोषण दुपारनंतर स्थगित करण्यात आले आहे. असे संगमनेर तालुक्यातील ओझर खुर्द येथील सामाजिक कार्यकर्ते व उपोषण कर्ते मच्छिंद्र रामा यादव यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
त्यांनी या पत्रकात म्हटले आहे की,सरकारने गाईला राज्य मातेचा दर्जा दिलेला आहे व घोषित केलेले आहे. आई आणि गायी हे दोन्ही शब्द ऐकायला जरी वेगळे असले तरी ते एकच आहे. हिंदू धर्मियांची गाय ही दैवत आहे. गायीची मनोभावे सेवा केल्याने गायीच्या कानामध्ये जे आपण दुःख आहे ते सांगितल्यास आपले दुःख कमी झाल्याशिवाय राहणार नाही. हे तज्ञांचे मत आहे .माता-पिता आणि गोमातेची सेवा केल्याने जीवन सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही .अशी हिंदू धर्मियाची भावना आहे.
गाई मळे अमृततत्त्व ,शेतीपासून तर व्यवसाया पर्यंत गायीचा लाभ होतो.
गायीचे पंच गव्य पवित्र आणि दूध दही तूप गोमूत्र लाभ कार्य आहे. गोमाईला पाच तत्त्वांना पंचगव्य म्हणतात लहान मुलांना जर आईचे दूध मिळाले नाही तर देशी गाईचे दूध दिले जाते. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार म्हणूनच गाईला मातेचा आईचा दर्जा दिलेला आहे गोमुत्रा पासून आपणास अनेक फायदे होतात गाईचे दूध पचायला चांगले असते. गोमित्रात भरपूर खनिज आणि औषध बनविली आहे. हृदयविकार कॅन्सरवर औषधे आहेत.गोबर,
शेना पासून घराची साफसफाई केली जाते हे एक कीटकनाशक आहे शेतीसाठी खत आहे .गायीचे शेणापासून गवरी तयार केली जाते आणि ती गवरी पेटवल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.33 कोटी देव गायीच्या शरीरामध्ये असतात.असे हिंदू धर्मात म्हटले आहे दूध,दही,श्रीखंड, यापासून आपणास मानवाला बुद्धी व ताकद मिळते. रिसर्च करणाऱ्याला विचारा की गाईचे महत्त्व किती मोठी आहे.दूध तर बकरी,शेळी ,मेंढी, कुत्री,मांजरी,डुकरे सुद्धा दूध देतात परंतु गाईचे दूधच बाळाला पाजले जाते म्हणून गाईला हिंदू धर्मामध्ये अनन्य साधन महत्त्व आहे .सायन्स सांगते एक तोळा गायचे तूप जाळल्याने हवेत एक टन शुद्ध ऑक्सिजन मिळतो. गोमूत्र पिल्याने असंख्य आजार बरे होतात .असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. गाईचे तुप जाळल्याने वातावरण शुद्ध होते. कोरोनाच्या काळात डॉक्टर व तज्ञांनी गायीचे तूप जाळण्याचा सल्ला दिला होता. प्राचीन ज्ञानामध्ये गाईच्या सहवासाने माणसे बुद्धीने व पैशांनेही मोठी श्रीमंत झालेली आहे. त्यात मुकेश अंबानी, नरेंद्र मोदी हे देखील आहे
चर्मरोग त्वचारोगावर गाईचे शेण व गोमूत्र त्वचेवर लावल्याने त्वचारोग बरा होतो. असे आयुर्वेदात सांगितले आहे. गाईच्या शेणामध्ये माता लक्ष्मीचा वास आहे. गाईचा श्वास ऐकल्यावर मनाचा ब्लेड प्रेशर कमी होतो. असे पश्चिम देशात सांगितले आहे. त्यामुळे भारत माता या देशात गोमातेचा अपप्रचार थांबवण्यासाठी मालपाणी उद्योग समूहाने तंबाखू पुडीवर टाकलेले गाई नावाचा शब्द व गाईचे छायाचित्र कमी करण्यात यावे,ते हटवण्यात यावे, यासाठी मी लोकशाही मार्गाने एक जानेवारी 2025 रोजी उपोषणास बसलो. या माझ्या उपोषणाची दखल .
श्रीकांत लोमटे नायब तहसीलदार उपविभागी अधिकारी या शासकीय अधिकाऱ्यांनी घेऊन, माझे निवेदन स्वीकारून आपली मागणी तातडीने शासनाला कळविले जाईल असे आश्वासन दिल्यामुळे आपण आपले उपोषण स्थगित करत असल्याची माहिती ओझर खुर्द तालुका संगमनेर येथील मच्छिंद्र रामा यादव या सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.
0 Comments