शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी येथील
श्री साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीच्या मान्यतेनुसार, नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर श्री साईबाबांच्या दैनंदिन होणाऱ्या मध्याह्न, धूप व शेजारतीसाठी सामान्य रांगेतील दोन साईभक्तांना पुढे उभे करण्याच्या कार्यपद्धतीचा शुभारंभ करण्यात आला आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ आज बुधवारी एक जानेवारी 2025 रोजी श्री साई समाधी मंदिरात दुपारच्या दुपारच्या मध्याह्न आरतीवेळी करण्यात आला, ज्यामध्ये उत्तर प्रदेशातील झांसी येथील श्री मनीष रजक आणि सौ. पूजा रजक या साईभक्त दांपत्याला हा मान मिळाला. दर्शन रांगेत कुठे असणाऱ्या या दोन साई भक्तांना श्री साई समाधी मंदिरात मध्यान आरती साठी अगदी जवळ उभे करण्यात आले आरती नंतर या साईभक्तांचा सन्मान श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते व देणगीदार भक्तांच्या समवेत करण्यात आला.
ही नवीन कार्यपद्धती सामान्य भक्तांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरते, ज्यामुळे त्यांना साईबाबांच्या आरतीत अधिक जवळून सहभागी होण्याची अनोखी संधी मिळणार आहे. हा उपक्रम भक्तांच्या भावनांचा आदर राखत साईबाबांच्या चरणी त्यांची सेवा व श्रद्धा अधिक दृढ करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल. पंढरपूरला आषाढी एकादशीच्या दिवशी ज्याप्रमाणे दर्शन रांगेतील दोन भक्तांना पूजेला मुख्यमंत्र्यांसमवेत मान मिळतो त्याच पद्धतीने शिर्डीतही आता दररोज होणाऱ्या मध्यान, धूप व शेजारतीसाठी सामान्य रांगेतील दोन साई भक्तांना साई समाधी मंदिरात आरतीला पुढे उभे राहून मान मिळणार आहे. त्या निर्णयाचे साई भक्तांमधून मोठे स्वागत होत असून समाधान व्यक्त होत आहे.
0 Comments