औरंगपूर सोसायटीच्या चेअरमन पदी विखे गटाचे भाऊसाहेब तळोले यांची बिनविरोध निवड

लोहगाव ( वार्ताहर)


संगमनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या औरंगपूर विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी विखे पाटील गटाचे श्री भाऊसाहेब पुंजा तळोले यांची बिनविरोध निवड झाली आहे .

यावेळी जनसेवा मंडळाचे  सामाजिक कार्यकर्ते श्री विजयराव डेंगळे पाटील माजी उपसरपंच इंद्राभान तांबे पाटील  माजी सरपंच लक्ष्मण चोपडे पाटील सरपंच सौ. लक्ष्मीबाई वाकचौरे उपसरपंच सौ.मीनाक्षी वदक सोसायटीचे सचिव श्री गणपत लोखंडे तसेच सोसायटीचे सर्व संचालक व जनसेवा मंडळाचे कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनिर्वाचित चेअरमन भाऊसाहेब तळोले यांचे महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील प्रवरा मेडिकल ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र विखे पाटील यांनी अभिनंदन केले आहे

Post a Comment

0 Comments