दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.23 - युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी सोयगाव येथील पत्रकार विजय काळे यांची संघटनेच्या एका कार्यक्रमात नियुक्ती करण्यात आली. युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश रामराव कचकलवार यांच्याहस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. विजय काळे यांची मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल.
पत्रकार संदीप इंगळे,बाळू शिंदे,ईश्वर इंगळे,भास्कर श्रीखंडे, योगेश बोखारे, सामजिक कार्यकर्ते अमोल निकम, समाजसेवक दत्तू रोकडे, दिलीप सुरडकर,महेश मानकर,राम सोहनी,शाम पाटील,तुकाराम सोनवणे,गयास पठाण आदींसह प्रतिष्ठित नागरिकांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
0 Comments