टाकळीभान बेल पिंपळगाव रस्त्याच्या निष्कृष्ट कामाबाबत टाकळीभान ग्रामस्थांची हरकत



टाकळीभान: श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान बेल पिंपळगाव रस्त्याचे काम सुरू असून सदर काम निष्कृष्ट दर्जाचे होत असल्याबद्दलची तक्रार येथील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. 


   सदर रस्त्यासाठी आमदार निधीतून निधी मंजूर असून काम सुरू आहे या रस्त्यासाठी जुन्या खडीचा वापर होत असून जुनी रस्त्यावरील खडी, माती, मुरूम उकरून तोच रस्त्यावर दाबला जात आहे. त्यामुळे सदर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे चालू आहे त्यास आमची हरकत असून सदर रस्त्याच्या कामाच्या दर्जात सुधारणा करावी, व  सदर काम त्वरित थांबून, त्याची प्रत्यक्ष पाहणी अधिकाऱ्यांनी करावी व या रस्त्यासाठी जुनी खडी न वापरता नवीन खडी टाकण्यात यावी अशी हरकतीची लेखी तक्रार सार्वजनिक बांधकाम विभाग श्रीरामपूर यांकडे येथील ग्रामस्थांनी केली आहे. या तक्रार अर्जावर अजित थोरात, पंकज पटारे,सुनील बोडके, विलास बोडखे, द्वारकानाथ बोडखे आदींसह तक्रार अर्जावर ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments