भोकर येथे पत्रकार दिन साजरा.

टाकळीभान: पत्रकार हा लोकशाहीतील महत्त्वाचा स्तंभ असून समाजाला योग्य दिशा दाखवण्याचे काम पत्रकार बांधव आपल्या लेखणीतून करतात असे प्रतिपादन भोकर ग्रामपंचायतीच्या वतीने पत्रकार व गुणवंतांचा सन्मान कार्यक्रम प्रसंगी सरपंच शितल पटारे यांनी केले.

 
        भोकर ग्रामपंचायत कडून पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान तसेच गुणवंताचा गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले होते, याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना सरपंच शितल पटारे बोलत होत्या. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ ग्रामस्थ पुंडलिक पटारे होते.यावेळी भोकर, खोकर, टाकळीभान, मुठेवाडगाव माळवाडगाव व पंचक्रोशीतील पत्रकार बांधव यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच पटारे बोलताना म्हणाल्या की पत्रकार हा खरा समाजाचा आधारस्तंभ आहे, निर्भीड, सजग व निपक्षपातीपणे काम करून  सर्व समाजाला योग्य दिशेने नेण्याची ताकद पत्रकारांमध्ये असते. पत्रकार बांधव हे अन्यायाला वाचा फोडून समाज जनजागृतीचे मोठे काम करत असतात असे त्या म्हणाल्या. यावेळी बाबा पोखरकर, पत्रकार चंद्रकांत झुरंगे, बापूसाहेब नवले, दीपक दुधाळे सर यांनी मनोगत व्यक्त केले.
          कार्यक्रम प्रसंगी अण्णासाहेब चौधरी, खंडेराव पटारे ,नारायणराव पटारे ,दिलीपराव पटारे, भाऊसाहेब भोईटे ,सुदामराव पटारे, काकासाहेब पटारे, अशांकुर केंद्राच्या सिस्टर, शेळके मामा ,के. डी.चव्हाण सर ,काळुमामा डुकरे, दतात्रय पटारे ,भाऊराव सुडके ,रावसाहेब लोखडे मारूती शिदे ,लखन वाकडे, नानासाहेब तागड, राजेंद्र चौधरी ,भाऊसाहेब लोखंडे,  नवनाथ मते   ,मधुकर वाकडे, तसेच याप्रसंगी स्टार प्रो कबड्डी खेळाडू शिवम पटारे यांचे वडील अनिल पटारे सर यांचा तसेच सार्थक वाकडे या विद्यार्थ्यांचा क्रीडा क्षेत्रातील यशाबद्दल सत्कार करण्यात आला . याप्रसंगी गावातील मान्यवर पदाधिकारी, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . सूत्रसंचालन संतोष मते यांनी केले तर सर्वांचे आभार सुदाम पटारे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments