दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.23 -भडगाव तालुक्यातून चोरीच्या उद्देशाने वाळू ची वाहतूक करणारे ढपंर दि.22 बुधवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास रात्रीच्या गस्तीत सोयगाव पोलिसांनी रंगेहाथ पकडून सोयगाव पोलीस ठाण्यात जप्त केले आहे या कारवाई मुळे विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे .
शेख मूक्तार शेख शब्बीर( वय 38) रा. तलवाडा ता. चाळीसगाव असे चालकाचे नाव असून नागद -बनोटी रस्त्यावर भडगाव तालुक्यातून चोरीच्या उद्देशाने विनापरवाना वाळूची वाहतूक करणारे ढपंर क्र-एम एच-20 बी जी- 5277 यामध्ये पाच ब्रास वाळू आढळून आली दरम्यान वाळू वाहतुकीची कोणतीही परवानगी नसतांना विनापरवाना वाळूची वाहतूक करतांना पोलीस उपनिरीक्षक गणेश झलवार यांच्या निदर्शनास आले त्यांनी ढपंरच पाठलाग करून वडगाव(तिगजी) फाट्यावर पकडले दरम्यान वाहन चालक शेख मूक्तार शेख शब्बीर( वय 38) रा. तलवाडा ता. चाळीसगाव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाई मध्ये बारा लक्ष रु चे ढपंर सह 25 हजार रुपयांची वाळू असा एकूण बारा लाख,25 हजार रु चा मुद्देमाल हस्तगत केला आहे दरम्यान विनापरवाना वाळूची वाहतूक प्रकरणी सोयगाव पोलिसांनी कारवाई करून सोयगाव तहसील कार्यालयात पत्र दिले आहे त्यामुळे आता महसूल कडूनही कारवाई करण्यात येणार आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश झलवार, रजाक शेख, सादिक तडवी,राजू बर्डे,रवींद्र तायडे,सुसर, अजय कोळी,गजानन दांडगे,आदी करत आहे.
0 Comments