टाकळीभान( प्रतिनिधी- )
श्रीरामपूर तालुक्यातील वांगी बु येथील गट नं. 50 मधील खातेदार श्रीम. रखमाबाई सोपान थोरात व विलास सोपानराव थोरात व पोपट सखाराम विटनोर यांचे रस्त्याच्या वादातुन मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906 चे कलम 5 (2) अन्वये तहसीलदार, श्रीरामपुर यांचेकडे अर्ज दाखल केला. सदर अर्जाच्या संदर्भात रस्ता खुला करणेसाठी तहसिलदार साहेब, यांनी निवासी नायब तहसिलदार वाकचौरे साहेब व ग्राम महसुल अधिकारी अशोक चितळकर यांची नेमणुक केली.
त्या अनुषंगाने सदर गटातीत अडविलेला रस्ता महसुल अधिकारी व स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने सामंजस्याने लगेच खुला करण्यात आला. रस्ता लगेच खुला झाल्याने अर्जदार व स्थानिक शेतकरी यांनी समाधान व्यक्त केले. "सरकारी काम अन 6 महिने थांब" अशी म्हण महसूल अधिकारी यांच्या कार्यकुशलतेने व स्थानिक शेतकरी यांच्या मध्यस्थितीने तक्रारदार शेतकरी यांच्यामध्ये सल्लामसलत करुन खोटी ठरविली... रस्ता लगेच खुला झाल्याने विवादीत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी निवासी नायब तहसिलदार वाकचौरे साहेब, ग्राम महसुल अधिकारी अशोक चितळकर, प्रशिक्षणार्थी ग्राम महसुल अधिकारी कु. अमोलिक मॅडम, खिर्डी पोलीस पाटील दिलीप हळनोर, वांगी बु. पोलीस पाटील, अशोक सहकारी साखर कारखाना संचालक योगेश विटनोर, खिर्डी ग्रामपंचायत सदस्य अनिल चितळकर, दिलीप रणनवरे, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते,
0 Comments