मा.आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीत येऊन घेतले श्री साईबाबांचे दर्शन!

शिर्डी (प्रतिनिधी)
 शिर्डी विधानसभा मतदारसंघातून नुकतेच निवडून आलेले आमदार मा. ना. राधाकृष्‍ण विखे पा. यांनी आज गुरुवारी शिर्डीत श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.


 साईदर्शनानंतर त्‍यांचा श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने प्रशासकिय अधिकारी तथा प्र उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले यांनी त्‍यांचा सत्‍कार केला. यावेळी प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आदी उपस्थित होते.
साई दर्शनानंतर शिर्डीमध्ये कार्यकर्त्यांनीही त्यांची भेट घेतली. अनेक ठिकाणी त्यांचा विजय झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments