शिर्डी ( प्रतिनिधी)
आध्यात्मिक अनुभूतींच्या अनंत आकाशात माध्यान्हीच्या सूर्याप्रमाणे तळपणारी एक अनन्यसाधारण विभूती म्हणजे "ज्ञानेश्वर महाराज!"अशा म्हण संत ज्ञानेश्वर माऊलींचा आज गुरुवारी संजीवन समाधी सोहळा आहे.
आजची पहाट म्हणजे आळंदीकरांसाठी डोळ्यातून टपटपसरून जाणारा दिवस ठरला होता कारण 11 डिसेंबर 2023 आजच्या दिवशी गुरुवार शके १२१८ कार्तिक वैद्य त्रयोदशी इसवी सन 1296 या दिवशी विश्वाला तत्त्वज्ञानाचे धडे शिकवणाऱ्या माऊली संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपला संजीवन समाधी दिन निश्चित केला होता. संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपण ज्या कार्यासाठी जन्म घेतला होता ते काम आपल्या हातून पार पडले आहे .अशी भावना आपल्या सहकाऱ्यांसोबत बोलवून दाखवत आळंदीतील इंद्रायणी नदीच्या काठी वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी 12 96 कार्तिक महिन्यात इसवी सन 1296 गुरुवार कार्तिक वैद्य त्र्ययोदशी या दिवशी संजीवन समाधी घेतली होती. आजचा हा 728 वा संजीवन समाधी सोहळा आहे.व आज गुरुवारही आहे. त्याचप्रमाणे 28 तारीख आहे. हा एक योगायोग आहे. अशी माहिती प्रसिद्ध कीर्तनकार व श्रीक्षेत्र भऊर ते श्रीक्षेत्र आळंदी या दिंडीचे मार्गदर्शक ह भ प संजयजी महाराज जगताप (भऊरकर )यांनी दिली.
पाचांसहित लयातीत जालिये वो अनुसरले प्रेमभक्ति काळ्या रूपासि वो ||
संत ज्ञानेश्वर माऊलींची समाधी ही संजीवन समाधी आहे. योग्याच्या समाधीमध्ये पंचमहाभूतांपैकी पृथ्वी व जल हे तत्त्व झडून जाते व तो योगी वायुरूपाने अथवा तेजोरूपाने उरतो. ज्ञानेश्वर माऊलींनी मात्र आपण पंचमहाभूतांसहित लयातीत म्हणजे अमर झालो आहोत असे सांगितले आहे. हे त्यांनी विठ्ठल भक्तीने साध्य केले.माऊलींचे अवतार कार्य संपल्याने त्यांना हा तात्पुरता कल्याणासाठी मिळालेल्या देहाची आणि आत्म्याची मोकळीक करायची होती.
कोणाचें हें घर हा देह कोणाचा ।आत्माराम त्याचा तोचि जाणे!
जनसामान्याला त्याचा देह.. घर संपत्ती.. पद.. प्रतिष्ठेचा अभिमान असतो. पण या देहाचे घर किती दिवस टिकणारे आहे.. त्याचा मालक कोण ठाऊक नसते. ज्ञानेश्वर माऊली हे कर्मयोगी होते यात कुणालाच शंका नाही. गीतेत अर्जुनाने भगवंताला विचारलेल्या सात प्रश्नांची उत्तर माऊलींनी ज्याप्रकारे विस्तृतपणे दिली त्यावरुन हे सिद्ध होते. जे योगी असतात ते जन्मभर भगवंताचे नामस्मरण करतात.
निवृत्ति सखा माझा दीनदयाळ श्रीगुरु ।*
अळंकापुरीं स्थापियेलें दिधला विठ्ठल उच्चारु ।*
समाधि जीवन माझें वरी अजानवृक्षतरु ॥*
जोंवरी चंद्रसूर्य तोंवरी कीर्तिघट स्थिरु ॥*
यातील वर्णनसुद्धा समाधीमधे माऊली विठ्ठल नामाचा उच्चार करत आहे असे दाखवते.
ज्यांनी इंद्रियविजय प्राप्त केलेला असतो, ते योगी काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यापासून दूर असतात. त्यांच्यावर मायेचा प्रभाव पडत नाही. सुख असो वा दुःख ते समबुद्धीनेच बघून अविचल असतात. अशा योगीजनांना अंतकालाची जाणीव होते. त्यांच्या डोक्यात अंतःकाली भगवंताशिवाय कोणतेच विषय नसल्याने, ते इच्छापुर्तीसाठी पुन्हा जन्माच्या फेऱ्यात अडकत नाहीत. अंतकाळी देहाला यातनाही होत नाहीत. ते मायेला दूर सारुन आनंदाने परमधामात येतात. त्या संजीवनी समाधी सोहळ्याचे वर्णन तरी किती करायचे ! त्या साठी शब्द तोकडे पडतात !. तुळशीच्या.. फुलांच्या आसनावर पद्मासन घालून योगी आनंदाने गुरुंना वंदन करुन 'ॐ कार' स्मरण करतात, तेव्हा या प्रिय भक्ताला आदि.. अनंत अर्थातच कधीही नष्ट न होणाऱ्या अक्षरधामात.. परमधामात सन्मानाने नेण्यासाठी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण अवतरतात. जन्मानंतर परमेश्वराने सोपविलेले विहित कार्य उत्तमपणे पूर्ण केल्याचे समाधान या योगींना लाभलेले असते.
ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यात हेच दृश्य होते. उपस्थित संतजनांना याची कल्पना होती. पण तरीही उपस्थित कुणालाही भावनावेग आवरणे शक्य नव्हते. माऊलींनी त्यांना त्रास देणाऱ्यांविषयीही अवाक्षर काढले नाही. याउलट त्यांनाही कल्याणाचा मार्ग दाखवला. समतेची वाट सर्वाना दाखवली. ज्ञानेश्वरी.. चांगदेव पासष्टी.. हरिपाठ.. अमृतानुभव जगाला अर्पण केला. माऊलीचे ज्ञानामृत भक्ताना सदैव संजीवनीच देत आहे.
माऊलींचा देह जरी पंचमहाभूतामध्ये विलीन पावला तरीही आत्मरुप चैतन्य उर्जा... त्याची स्पंदने मात्र भागवत भक्तांना जाणवतात. भौतिक जगातील सुखदुःखात सुख.. समाधान.. मनःशांती आणि माऊलीनी देशाला आनंदी जीवनासाठी दीशा दिली. त्यामुळेच गावोगाव हरिनामाचा गजर सुरु झाला.
पुढे अनेक संतांनीही भगवद पंथास आणखी पूढे नेले. या भक्तीच्या इमारतीचे तुकोबांनी कळस केला. त्यांच्या शिष्या संत बहिणाबाई पाठक यांनी त्याचे सुंदर वर्णन केले आहे ;
संतकृपा झाली । इमारत फळा आली ।।*
ज्ञानदेवे घातला पाया । उभारिले देवालया ।।*
नामा तयाचा किंकर । तेणे केला हा विस्तार ।।*
जनी जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत ।।*
तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।।*
बहेणी फडकते ध्वजा । निरुपण आले ओजा ।।*
आज या विश्वात भारताची ओळख आध्यात्मिक देश म्हणून आहे. निवृत्तीनाथांनी माऊलींच्या मनात रोवलेल्या मोगऱ्यांच्या फुलांचा सुगंध जगभर पसरला. जग भारताकडे विश्वगुरु म्हणून बघू लागले आहेत.
स्वतःच्या धाकट्या बंधुला संत निवृत्तीनाथांनी संजीवन समाधी स्थळाकडे घेऊन जावे लागले होते.
समाधी घेऊन जाई ज्ञानदेव ।सोहळा अपूर्व जाहला गे माये ।।
निवृत्तीनाथांनी चालविले हाती ।*
पाहुन ती मूर्ती धन्य वाटे ।*
आपण निर्गुण मागे परी दान।*
विश्वाचे कल्याण-निरूपण ।।*
सोपान मुक्ताई जाहली व्याकुळ मायेचे हे बळ राया बोले ।*
ब्रम्हाशी ही गाठ अमृताचे ताट ।फुटली पहाट ब्रम्हज्ञान ।।*
नीर वाहे डोळां वैष्णव नाचतो ।*
वैकुंठासी जातो ज्ञानराया ।*
सोन्याचा पिंपळ झालासे निश्चळ सज्जनाचे बळ समाधान ।।*
गुरू देई शिष्या समाधी आपण ।देवा ऐसे मन का बा केले !*
पद्माचे आसन घालविले जाण ।*
ओंकार ते पूर्ण पंचप्राण ।।*
पैलतिरी हाक आली आज कानी करूनी निर्वाणी बोलविले ।*
ज्ञानाचा पुतळा तेजी विसावला ।कैवल्यचि झाला भक्तजन ।।*
कवी बा. भ. बोरकर यांनी या सोहळ्याचे अगदी ह्रदयाला भिडणारे वर्णन केले आहे;
रडणे बरे दिसणार नाही' म्हणून महत्प्रयासाने अश्रूंना थोपवून धरले तरी त्या सार्यांचेच कंठ पुन:पुन्हा दाटून येत होते. ज्या भिंतीवर बसून चारही भावंडे चांगदेवांना भेटण्यासाठी गेली होती ती भिंतदेखील दु:खावेगाने कोसळली !. एरवी कुठल्याही बर्यावाईट घटनेला वा अडीअडचणीला धीराने सामोरे जाणारे संत आणि गंभीर वृत्तीचे सज्जनही पार गोंधळून गेले.
संत ज्ञानदेवांची भक्ती करणारे बोरकर त्यांच्या समाधीचा कारून प्रसंग रंगवताना म्हणतात;ज्ञानदेव गेले तेव्हा, कोसळली भिंत।*
वेद झाले रानभरी, गोंधळले संत ।।*
ज्ञानदेव गेले तेव्हा, आटे इंद्रायणी मराठीच्या वडातळीं, जळूं लागे पाणी।।*
ज्ञानदेव गेले तेव्हा, ढळला निवृत्ती ।*
आसवांच्या डोही, झाली विझू विझू ज्योती।।*
ज्ञानदेव गेला तेव्हा, तडा विटे गेला ।*
बाप रखमा देविवरु, कटीत वाकला ।।*
ज्ञानदेव गेले तेव्हा , बापुडला नामा।*
लागोपाठ भावंडें, तीं गेली निजधामा।।*
माझ्या ज्ञानराजा, तें रे कळों आले आज।*
भरदुपारीं ही तशी, झाली तीनसांज।।*
तेव्हांच्यासारखा, पुन्हा बावला मोगरा।*
भुईभर झाल्या कळ्या, तुटला आसरा।।*
इथे आळंदीत , आतां ऊर फाटे।*
पंढरीच्या वाटेंतही, बाभळीचे काटें।।*
कळ्यांचाहि वास जिवा, जाहलासे फांस।*
एकाकीं प्रवास आतां, उदास उदास।।*
अशा या विश्वाच्या माउलीने जनकल्याणा करीता जन्म घेऊन, अवतार कार्य संपताच संजीवन समाधी घेतली. त्या माऊलीच्या चरणी दोन्ही हात आणि मस्तक ठेवून कोटी कोटी वंदन आहे. असे सांगत संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं पसायदान या तेव्हा ज्ञानेश्वरांना प्राप्त झालेल हे अनमोल ज्ञान फक्त एक गुरु एक शिष्य देता होतं होतं. हे अनमोल ज्ञान संपूर्ण जगासाठी खुलं व्हावं आणी लोकांना भक्तीच सत्य कळावं यासाठी त्यांनी पसायदान मागितले.
ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका) नावाचा १८ अध्याय व ९००० ओव्या असणारा ग्रंथ त्यांनी 1290 साली लिहिला. हा ग्रंथ गीतेवरील टिका म्हणून ओळखला जातो. ह्या ग्रंथामधील ओव्या इतक्या सुंदर आहेत कि त्याचा मतितार्थ माणसाला सहज समजतो. खऱ्या भक्तीच्या व मोक्ष प्राप्तिचा मार्ग सांगणाऱ्या या सुंदर ओव्या ज्ञानेश्वरांनी या ग्रंथामध्ये लिहिल्या आहेत. हा ग्रंथ त्यानी नेवासे या स्थानी लिहिल्याचे संगितले जाते.
त्यांनी अमृतानुभव नावाचा एक ग्रंथ लिहिला. साधारणतः 800 ओव्या असणारा जीवनाचे खरे तत्वज्ञान वं जीव शिव ऐक्याचे महत्व सांगणारा हा ग्रंथ खूप सुंदर आहे.
आज वारकरी संप्रदायामध्ये भजन कीर्तनामध्ये या विश्वाचा हरिचा महिमा गाणारा जों हरिपाठ गायला जातो. ते हरिपाठाचे अभंग सुद्धा संत ज्ञानेश्वरांची रचना आहे.
1400 वर्षे जगून अध्यात्मिक दृष्ट्या कोऱ्या राहिलेल्या चांगदेवाना 65 ओव्यांचे पत्र लिहून त्यांना भक्तीचे मर्म सांगणारा चांगदेव पासष्टी ही त्यांचीच रचना.
संत ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी
आपण ज्या कार्यासाठी जन्म घेतला होता ते काम आपल्या हातून पार पडलं आहे. अशी भावना आपल्या सहकार्यासोबत बोलवून दाखवत, ज्ञानेश्वरांनी आळंदीतील इंद्रायणी नदीच्या काठी वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी 1296 साली कार्तिक महिन्यात (इ. स. १२९६, गुरुवार, कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दुर्मुखनाम संवत्सर) संजीवन समाधी घेतली. तो संजीवन समाधी चा आजचा दिवस असून आज गुरुवार आहे व 28 तारीख आहे हा एक योगायोग आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींना संजीवन समाधी सोहळा दिनानिमित्त साष्टांग वंदन आहे. असे प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प संजय महाराज जगताप (भऊरकर) यांनी म्हटले आहे.
0 Comments