अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी राहाता मतदान संघातील लोहगाव प्रवरानगर येथील राष्ट्रीय पत्रकार कोडीराम परसराम नेहे पाटील यांना भारतीय लहुजी सेनेच्या वतीने जांभेकर समाज भूषण पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला असुन त्या पुरस्काराचे वितरण श्रीरामपूर तालुक्यात शनिवारी दि.३० नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे.
हा पुरस्कार भारतीय लहूजी सेनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल यांनी. लेखी पत्राद्वारे कोडीराम नेहे पाटील यांना कळवले आहे. श्रीरामपूर येथील क्रांति गुरु लहुजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणार आहे.अशी माहिती. भारतीय लहूजी सेनचे राष्ट्रीय सचिव. हनिफ भाई पठाण यांनी दिली आहे.
नेहे पाटिल यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. यांनी.पत्रकारेतेच्या माध्यमातून
सामाजिक धार्मिक शैक्षणिक आणि गोरगरीब जनतेवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडून पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम केले
त्यांच्या या कार्याबद्दल श्रीगोंदा तालुक्याच्या वतीने व पत्रकार नंदकुमार बगाडे पाटिल यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
0 Comments