टाकळीभान प्रतिनिधी- मुंबई येथे सह्याद्री अतिथिगृह, मंत्रालय परिसरात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस मा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची, पालकमंत्री तथा नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांची, शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष नेते ॲड. अजितदादा काळे साहेब यांनी भाजप जिल्हाध्यक्ष नितीनजी दिनकर यांच्यासमवेत भेट घेतली.
या भेटीदरम्यान श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव मळ्यातील नऊ गावातील अकारि पडित शेतकरी बांधवांच्या हक्काच्या जमिनी त्यांना लवकरात लवकर परत मिळाव्यात, यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील हरेगाव, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर येथील जमिनी मूळ मालक शेतकऱ्यांना परत मिळाव्यात, तसेच संबंधित अधिनियम १९६१ मध्ये आवश्यक सुधारणा करून राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाची महामहिम राज्यपाल महोदयांनी स्वाक्षरी करून प्रभावी अंमलबजावणी व्हावी,
शेतकरी बांधवांना त्यांच्या हक्काचा न्याय मिळावा आणि त्यांच्या जमिनीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा, हाच या भेटीमागील मुख्य उद्देश होता.
या महत्त्वपूर्ण विषयाकडे सकारात्मकतेने लक्ष देण्यासाठी मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब व मा.न.चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी या प्रश्नासाठी मार्गदर्शन व सहकार्य केले,
0 Comments