सावळीविहीर येथील प्रसिद्ध व पुरातन श्री भवानी माता मंदिर सभा मंडपाच्या विस्तारीकरण भूमिपूजनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न!

शिर्डी ( प्रतिनिधी)- राहाता तालुक्यातील सावळीविहीर येथील पुरातन व प्रसिद्ध अशा नवसाला पावणाऱ्या श्री भवानी माता मंदिराच्या सभा मंडपाचा आणखी मोठ्या स्वरूपात विस्तार करण्यात येणार असून या मंदिर विस्तारीकरणाचा भूमिपूजन समारंभ नुकताच विजयादशमीच्या मुहूर्तावर या मंदिराजवळ संपन्न झाला.


    संपूर्ण पंचक्रोशीतील श्रद्धास्थान असणाऱ्या सावळी विहीर येथील गोदावरी कालव्याच्या तीरावर श्री भवानी माता व श्री कालिका माताचे पूर्वमुखी पुरातन असे मंदिर आहे. नुकताच येथे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. येथून जवळच शिर्डी एमआयडीसी सुरू होत आहे. ना. राधाकृष्ण विखे पा. व युवा नेते डॉ.सुजय दादा विखे पा. यांच्या मार्गदर्शनाखाली या मंदिरा शेजारील रस्ताही आता मोठा झाला असून कालव्यावर रुंदपुलाचे बांधकाम झाले आहे. 

पंचक्रोशीतील हे प्रसिद्ध मंदिर असून येथे नवरात्र उत्सव तसेच आषाढ महिन्यात व चैत्र नवरात्रीला मोठी गर्दी असते. येथे एमआयडीसी होत असल्यामुळे भविष्यात भाविकांची संख्या येथे वाढणार आहे. येथे सध्या मंदिर व सभामंडप आहे. मात्र आणखी सभामंडप मोठा व्हावा अशी भाविकांची व येथील ग्रामस्थांची इच्छा असून विजया दशमीच्या दिवशी या श्री भवानी माता मंदिर सभा मंडपाच्या विस्तारीकरणाचे भूमिपूजन गुरु पांडे यांच्या विधिवत पूजनाने येथील श्री भवानी माता नवरात्र यात्रा उत्सव मंडळाचे पदाधिकारी सोपान वर्पे, भीमाराज वर्पे, संजय वाघमारे, संजय उगले, पुजारी गौतम कोळगे, शुक्लेश्वर वर्पे, विजू जमधडे अण्णा वर्पे ,अतुल वर्पे, अमोल विखे, दीपक पाठक, गणेश जमधडे, दत्तू जमधडे, राजेंद्र उगले, सुधीर वर्पे, आदींच्या उपस्थितीत कुदळी मारून करण्यात आले. यावेळी भीमा वर्पे यांनी सांगितले की, येथे दोन्ही सावळीविहीर, व पंचक्रोशीतील जेष्ठ नेते, सर्व संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ ,भाविक यांच्या सहकार्याने लवकरच सभामंडप विस्तारीकरण होणार असून भाविकांनी त्यासाठी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन करत लवकरच युवा नेते डॉ. सुजयदादा विखे पा. यांनाही या सभामंडपाचे प्रत्यक्षात काम सुरू करताना भूमिपूजन करण्यासाठी आमंत्रण देण्यात येणार आहे ‌. या भूमिपूजन कार्यक्रमाला जय भवानी तरुण मंडळाचे कार्यकर्ते ग्रामस्थ तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments