टाकळीभान येथील निवृत्त पोस्ट कर्मचारी भाऊसाहेब वाडेकर यांच्या घरी जबरी चोरी 2 लाख 90 हजाराचे सोने चांदीचे दागिन्यांसह रोख रक्कम चोरट्यांनी केली लंपास(तपासासाठी पोलीस यंत्रणेने केले श्वान पथकाला पाचारण)




दिलीप लोखंडे 

टाकळीभान: येथील निवृत्त पोस्ट कर्मचारी सुखदेव वाडेकर यांच्या राहत्या घरातून काल रात्री दीडच्या सुमारास 2 लाख 90 हजाराचे सोने चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरट्यांनी घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या बाथरूम मधून प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी जबरी चोरी करून पसार झाले आहेत. त्यामुळे टाकळीभान सारख्या मोठ्या गावातील भर लोक वस्तीमध्ये चोरी झाल्याने खळबळ उडाली असून या चोरीमध्ये वाडेकर कुटुंबीयांची मोठी हानी झाल्याचे समोर आले आहे. या चोरी संदर्भात वाडेकर यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


सविस्तर वृत्त असे की टाकळीभान येथील निवृत्त पोस्ट कर्मचारी सुखदेव वाडेकर (वय 73) हे आपल्या कुटुंबासह खळवाडी परिसर टाकळीभान तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर येथे राहतात.
 वाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मी माझी पत्नी-उषा, मुलगा-सचिन, सुन- टाकळीभान प्राईड प्री स्कूलच्या प्राचार्य जयश्री व दोन नातवंड आहेत नातु अनघ, नात सानवी शेती व्यवसाय व पेन्शनवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. तसेच मुलगा एमआयडीसी अहिल्यानगर येथे नोकरीस आहे. तो आठ दिवसातुन एकदा तो घरी येत असतो. आम्ही आमचे घराचे हॉलमधील टेबलचे एक नंबरचे ड्रॉव्हर मध्ये नेहमी पत्नी उषा हिचे दागिने लॉक करुन ठेवत असे.
दि. 24/10/2026 रोजी रात्री 00/30 वा. चे सुमारास मी शेतीला पाणी भरुन घरी येवुन दरवाजा बंद करुन मी व माझी पत्नी हॉलमध्ये झोपलो. तेव्हा तेथे माझे अंथरुणाजवळच टेबल सुस्थितीत होता व टेबलचे एक नंबरचे ड्रॉवरला लॉक होते. माझी सुन जयश्री व नातवंड त्यांचे बेडरूम मध्ये झोपले त्यानंतर सकाळी 06/00 वा. चे सुमारास आम्ही उठलो तेव्हा माझे जवळ असलेला टेबल मला दिसला नाही. म्हणुन मी पत्नी उषा हिस उठविले व म्हणालो कि, आपला टेबल कुठे आहे तेव्हा आम्ही आजुबाजुला पाहिले असता घराचे सर्व दारे व खिडक्या उघडे दिसले म्हणून पत्नी उषा हिने आरडा ओरड करायला सुरुवात केली तेव्हा सुन नातवंड उठुन आले तसेच आमचे शेजारचे लोक आले त्यांना झालेला प्रकार सांगितल्यानंतर आम्ही सर्वजन घराचे बाहेर जावुन टेबल आजुबाजुला पाहिला पण दिसला नाही नंतर आम्ही सर्वजन गायांच्या गोठ्याजवळील पडदा थोडा बाजुला करून पाहिले तेव्हा तेथे टेबल दिसला व टेबलावर सोन्याचा रिकामा बॉक्स, व पैशाचा छोटा बॉक्स टेबलच्या जवळच खाली पडलेला होता त्यानंतर आम्हा टेबलचा एक नंबरचा ड्रॉवर पाहिला असता त्यात काही नव्हते त्या ड्राव्हरचे लॉक तुटलेले होते त्यानंतर टेबलचे दोन ड्रॉवर पाहिले असता त्यामध्ये ठेवलेले सर्व कागदपत्रांची उचका पाचक होवुन काही कागदपत्र खाली व काही ड्राव्हरमध्ये पडलेले होते. त्यानंतर आम्ही सर्वजन आजुन आपले घरात काही चोरी झाले आहे का ते पाहण्यासाठी घरात सुन जयश्री हिचे रुम मध्ये गेलो असता आम्हा कपाटातील काही वस्तु खाली अस्ताव्यस्त पडलेल्या दिसल्या नंतर सुन जयश्री हिने तिने कपाटात ठेवलेले नातवंडांचे व तिचे दागिने पाहिले असता तिला ते दिसले नाही त्यावर मी तिला विचारले कि, तु कपाटाला लाँक लावले होते का त्यावर ती आम्हाला म्हणाली कि कपाटाचे लॉक खराब झालेले आहे त्यामुळे मी लॉक लावले नव्हते. तेव्हा आमची खात्री झाली कि कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी आमचे संडास बाथरुमचे खिडकीतुन प्रवेश करुन आमचे घरातील टेबलचे लॉक केलेले ड्रॉव्हर मध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व पैसे तसेच सुन जयश्री हिचे कपाटात ठेवलेले तिचे व नातवंडाचे दागिने चोरुन नेले आहे.या चोरीमध्ये 
 1,00,000/-रु.किं. चे दोन तोळे मंगळसुत्र जु.वा. किं. अं. पत्नी उषा यांचे
85,000/-रु.किं.चे मिनी गंठण पाउने दोन तोळे जु.या. कि.अं.पत्नी उषा यांचे
25,000/-रु. किं.ची पाच ग्रॅमची अंगठी जु.बा. किं.अं. पत्नी उषा हिचे
20,000/-रु.कि.चे चार ग्रॅमची ठुसी जु.वा. किं.अं. पत्नी उषा हिची
5,000/-रु. किं.ची एक ग्रॅम नथ जु.वा. किं. अं. पत्नी उषा हिची
15,000/-रु. किं.चे मंगळसुत्र तीन ग्रॅम जु.वा. किं. अं. सुन जयश्री हिचे
10,000/- रु. किं. चे कानातील दोन ग्रॅम रिंगा व टॉप्स जु.वा. किं. अं. सुन जयश्री व नातवंडांचे
5000/-रु. किंमतीची मुरणी स्टोनची जु.वा. किं.अं. सुन जयश्री हिची
15,000/-रु. किं. च्या चांदीच्या वस्तु त्यात जोडवे, साकळी, वाटी, चमच्या, अंगठ्या दोन नग पायातील चाळ ,सुन जयश्री व नातवंडांचे
10,000/-रु. रोख रक्क्म त्यात 500 रु. दराच्या 20 नोटा. असे भाउसाहेब वाडेकर यांचे
एकुण- 2,90,000/-रु. किं.चे
तरी दि.24/10/2026 रोजी रात्री 00/30 वा. ते सकाळी 06/00 वा चे दरम्यान टाकळीभान खळवाडी येथे त्यांचे राहते घरातून सोन्याचे दागिने व चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम ही घराचे संडास बाथरुमचे उघड्या खिडकीतुन घरामध्ये प्रवेश करुन कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली आहे म्हणुन त्यांनी अज्ञात चोरट्यां विरुध्द फिर्याद दिली आहे. सदर चोरीचा तपास परी पोलीस उपअधीक्षक कल्पना पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय वराडे, हे. कॉ. नवनाथ बर्डे, पो. कॉ. दुर्गुडे, तसेच पोलीस मित्र बाबा सय्यद यांसह ओळख तपासासाठी सुधीर कराळे, रवींद्र गायकवाड, संपत घोडके यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा केला व सदर चोरीचा तपास करण्यासाठी सीमा श्वानपथकचे स. फौजदार डांगे, धोंगडे उपस्थित होते. यावेळी चोरीच्या ठिकाणापासून श्वान पथकाने तपासाला सुरुवात केली.तसेच इतर तपासासाठी श्रीरामपूर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत नैवेदिक प्रयोगशाळेचे कर्मचारी यांनीही चोरीच्या तपासासाठी माहिती घेतली.
जयश्री वाडेकर या प्राईड प्री स्कूलमध्ये मध्ये प्राचार्य असल्याने माजी सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी त्यांच्या घरी भेट देऊन पाहणी केली व त्यांचे सांत्वन केले.

Post a Comment

0 Comments