दिलीप शिंदे
सोयगाव दि.२८-- तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालक पदाच्या दि.२८ बुधवारी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे(शिंदे गट) संकेत राठोड यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा अध्यासी अधिकारी विजय लखवाल यांनी दुपारी दीड वाजता केली .
खरेदी विक्री संघाच्या सभागृहात बुधवारी सकाळी साडे अकरा वाजता अध्यासी अधिकारी विजय लखवाल यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेला सुरुवात झाली यावेळी १६ पैकी १५ संचालक सभागृहात, हजर होते तर एक संचालक गैरहजर राहिले होते. दरम्यान दिवंगत संचालक राजेंद्र राठोड यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणूक झाली यावेळी शिवसेनेचे संकेत राठोड यांचा एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाला त्यामुळे बिनविरोध निवड झाल्याची घोषणा सभागृहात करण्यात आली सूचक राधेश्याम जाधव,अनुमोदक भगवान वेहेळे होते. यावेळी सहकार अधिकारी देवकर, खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक बन्सीलाल बेडवाल,सचिव दिलीप रावणे,विलास घुगे,आदींनी सहायक म्हणून कामकाज पाहिले. शिंदेंसेनेचे संकेत राठोड यांची निवड होताच शिंदेंसेनेचे उपजिल्हा प्रमुख आबासाहेब( प्रभाकर) काळे यांनी नवनिर्वाचित संचालक संकेत राठोड यांचा सत्कार केला यावेळी राधेश्याम जाधव, भगवान वेहेळे, संतोष बोडखे, कुणाल राजपूत, गोविन्दा घोड़े,अतुल बोरसे ,गौरव बिंदवाल,संदीप राठोड, अनिल चव्हाण, चंदू कदम ,आबा पवार, दिलीप पवार, आशु चौधरी, रवि चोपड़े, पवन चोपड़े आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments