श्री साईंवर श्रद्धा ठेवून मनोभावे पारायण केले तर नक्कीच‌ जीवनात त्याचे चांगले फळ मिळते--मा. विश्वस्त शांताराम मीराणे सर

शिर्डी (प्रतिनिधी)-श्री साईबाबांचा श्रद्धा सबुरीचा संदेश आचरणात आणला, श्री साईंवर श्रद्धा ठेवून मनोभावे श्री साई सत चरित्र पारायण केलेतर नक्कीच जीवनात चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही‌. असे मत श्री साईबाबा संस्थानचे मा. विश्वस्त व नाट्य रसिक संचाचे संस्थापक श्री शांताराम मीराणे सर यांनी व्यक्त केले. 


  राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे सुरू असलेल्या श्री साई सच्चरित्र पारायण स्थळी त्यांनी भेट दिली. पारायण मध्यंतरामध्ये त्यांनी स्वतः छापलेले आणि अकरा व पंधरावा अध्याय असणारे पुस्तके यावेळी सर्व पारायणार्थींना मोफत भेट दिली. यावेळी त्यांनी थोडा वेळ उपस्थित पारायणार्थींना मार्गदर्शन करताना म्हटले की, प्रत्येकावर संस्कार चांगला होणे गरजेचे आहे व सत्संग, पारायणातून चांगले ज्ञान मिळते, चांगला संस्कार मिळतो. तेव्हा मनोभावे पारायण केले पाहिजे. असे सांगत काशीराम शिंपी हे श्री साईबाबांच्या काळात नसीम साईभक्त होते. ते आपल्या परिस्थितीनुसार अन्नदान करायचे, त्यामुळे त्यांच्या पुढच्या पिढीचीही भरभराट अजून आहे. ही साईबाबांची कृपा आहे. त्यामुळे आपणही अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान म्हणून करणे गरजेचे आहे. त्याचे भविष्यात नक्कीच फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. असे त्यांनी यावेळी सांगितले. शांताराम मीराणे सर यांचा साई सेवा संघाच्या वतीने पत्रकार राजकुमार गडकरी यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी मीराणे सर यांचा नातू तन्मय नितीन मीराणे हाही उपस्थित होता. 
या कार्यक्रमानंतर येथील सर्व पारायणार्थींना साईभक्त गणेश आगलावे यांनी श्री साई सत् चरित्र ग्रंथ ठेवण्यासाठी सुंदर पिशव्या मोफत दिल्या. मागील वर्षीही त्यांनी सर्वांना ग्रंथावरील सुंदर कव्हर भेट दिले होते. त्यांचाही यावेळी साई सेवा मंडळाच्या वतीने रावसाहेब आगलावे व रवी कापसे यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी पारायणाअर्थी व काही साईभक्त उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments