सावळविहिर बु. गावासाठी सामाजिक कार्यकर्ते नानाभाऊ कदम यांनी सुमारे पाच लाखाचा दिला नवीन वैकुंठ रथ!युवा नेते डॉ. सुजय दादा विखे पा. यांनी गोपाळकाल्याच्या मुहूर्तावर येथे श्रीफळ वाढवून केले लोकार्पण!

शिर्डी (प्रतिनिधी)-
राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक गावासाठी येथील हॉटेल व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते नानाभाऊ कदम यांनी आपल्या मातोश्री कै. तान्हुबाई विश्वनाथ कदम यांच्या स्मरणार्थ सुमारे पाच लाख रुपये किंमतीचा नवीन वैकुंठ रथ नुकताच दिला असून या वैकुंठ रथाचे लोकार्पण युवा नेते डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. 

  राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक हे लोकसंख्या व विस्ताराने मोठे गाव असल्यामुळे व अमरधाम हे गावात असल्यामुळे अनेकदा दूरवरून अंत्ययात्रा खांद्यावर आणावी लागते. आसपासच्या गावांमध्ये वैकुंठ रथ आहे. तो कधी कधी बोलवावा लागतो. मात्र सावळीविहीर बुद्रुक मध्ये वैकुंठरथ नव्हता. त्याची गरज लक्षात घेऊन हॉटेल सुयोगचे मालक नानाभाऊ कदम व विशाल कदम तसेच त्यांच्या सर्व परिवार व व्याही सोमनाथ भोसले यांच्या उपस्थितीत सुमारे पाच लाख रुपये किंमतीचा नवीन वैकुंठ रथ सावळीविहीर बुद्रुक गावासाठी दिला आहे. तो कोल्हार येथील केशर फॅब्रिकेशन कंपनीमध्ये बनविण्यात आला आहे .

या नवीन वैकुंठ रथाचे लोकार्पण गोपाळकाल्याचे दिवशी युवा नेते डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांनी श्रीफळ वाढवून केले. यावेळी नानाभाऊ कदम व त्यांच्या परिवाराचा डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांनी या यावेळी सन्मान केला. तसेच कदम परिवाराच्या वतीने ही डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला ‌. यावेळी ज्येष्ठ नेते साहेबराव जपे व ग्रामपंचायत आणि सोसायटीचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी यावेळी बोलताना सांगितले की , उद्योजक नानाभाऊ कदम यांनी सुमारे पाच लाख रुपये किमंतीचा हा वैकुंठ रथ सावळीविहीर बुद्रुक गावाला लोकार्पण केला आहे. ती येथे गरज होती. ती त्यांनी पूर्ण केली. त्यांचे अभिनंदन आहे. असे सांगितले. यावेळी सरपंच ओमेश जपे, बाळासाहेब जपे, आदीसह‌ सर्व संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments