दिलीप लोखंडे
टाकळीभान: सालाबाद प्रमाणे याही वर्षी गोकुळाष्टमी निमित्त सायंकाळी ७ वा.दहीहंडीचा कार्यक्रम टाकळीभान कमान(स्टँड परिसर) येथे पार पडला. दहीहंडी कार्यक्रम पाहण्यासाठी तरुण, बाल ,गोपाळ, ग्रामस्थ यांची मोठी गर्दी होती.
डीजेच्या तालावर थिरकत गोविंदा दहीहंडीचा आनंद घेत होते. दहीहंडी फोडण्यासाठी गावातील विविध ग्रुप यांनी प्रयत्न केले. त्यामुळे दहीहंडी कोण फोडणार याची उत्सुकता वाढत होती. दहीहंडी कार्यक्रम उत्साह पूर्ण वातावरणात सुरू असताना दहीहंडी फोडणाऱ्या एका ग्रुपमधील गोविंदा शेखर आबासाहेब रणनवरे हा दहीहंडी फोडण्यासाठी साखळी चढत असताना पडून जबर जखमी झाला, त्याला तातडीने श्रीरामपूर रुग्णालय येथे उपचारासाठी नेण्यात आले. यावेळी जय बजरंग तरुण मंडळांने दहीहंडी फोडण्याचा मान मिळवत रु. पाच हजार बक्षीस जिंकले.
0 Comments