राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विनोद एकनाथ आरणे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
सावळीविहीर बुद्रुक गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही केंद्र शाळा असून येथे पहिली ते चौथी चे वर्ग आहेत. येथील शाळेची, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढेल असे अनेक उपक्रम राबवण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत असतात. येथील मुख्याध्यापक मेहेत्रेसर व सर्व शिक्षक वर्ग सुद्धा त्यासाठी प्रयत्नशील असतात. अशा या शाळेची प्रगती अशीच वाढत राहो यासाठी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विनोद एकनाथराव आरणे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर त्यांचा युवा नेते मा,खा, डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांनी सावळीविहीर येथे एका दुकानच्या उद्घाटन प्रसंगी भेट दिली असता त्यांचा सत्कार केला.व अभिनंदन केले आहे. यावेळी सरपंच ओमेश जपे, उपसरपंच दत्तात्रेय आगलावे, बाळासाहेब जपे, शांताराम जपे, ग्रामपंचायत सदस्य गणेश आगलावे, आनंद जपे , गणेश कापसे,निलेश आरणे व ग्रामपंचायत, सोसायटी व सर्व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांचे शिक्षण प्रेमींकडून व शाळेतील विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्याकडूनही त्यांचे अभिनंदन होत आहे.
0 Comments