तालुका क्रीडा स्पर्धेत अलिना शेखचे यश



लोहगाव (वार्ताहर):शालेय तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत महात्मा गांधी कन्या विद्यालयाच्या कु. अलिना अन्सार शेख हिने उल्लेखनीय कामगिरी करत ४२ ते ४४ किलो वजनगटात सुवर्णपदक (गोल्ड मेडल) पटकावले. या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
अलिनाच्या या यशामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत असून, तिच्या यशामागे मार्गदर्शक शिक्षक प्रफुल नव्हाळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
अलिनाने आपल्या मेहनतीने, जिद्दीने आणि सातत्यपूर्ण सरावाने मिळविलेल्या या यशाबद्दल रावसाहेब म्हस्के पाटील, उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, एकनाथराव घोगरे पाटील, माजी प्राचार्य भिमराव आंधळे, प्राचार्य दिलीप डहाळे, मुख्याध्यापिका नलिनी जाधव, उपप्राचार्य संजय डुबे, पर्यवेक्षिका संगीता सांगळे, ज्यु. कॉलेज विभागप्रमुख डॉ. शरद दुधाट, संजय ठाकरे, माधुरी वडघुले, विलास गभाले, बाबासाहेब अंत्रे यांच्यासह पालक, शिक्षक व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments