आमखेडा ग्रामपंचायत गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीच्या लेखी आश्वासनानंतर विश्वनाथ बोडखे यांची उपोषण सोडले-



दिलीप शिंदे 
सोयगाव दि. १८--- आमखेडा येथील ग्रामपंचायतीच्या विविध प्रकरणांमधील कथित गैरव्यवहार व चौकशीतील दिरंगाई विरोधात आमखेडा येथील ६५ वर्षीय वृद्ध विश्वनाथ तुकाराम बोडखे यांना सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर बोडखे यांनी उपोषण स्थगित केले आहे. 

दरम्यान आमखेडा ग्रामपंचायतीशी संबंधित विविध प्रकरणांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी यासंदर्भात दोन वेळेस उपोषण वेळी चौकशीचे आदेश देऊनही कार्यवाही झाली नसल्याने विश्वनाथ बोडखे यांनी १७ सप्टेंबरपासून तहसील कार्यालयासमोर लक्षवेधी उपोषण सुरू केले होते. सहाय्यक गट विकास अधिकारी यांनी दि. १८ शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उपोषणार्थी विश्वनाथ बोडखे यांना दि.२१ सप्टेंबर रोजी चौकशी अहवाल देण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्याने उपोषणार्थी यांना सहाय्यक गट विकास अधिकारी अमोल जगताप यांच्याहस्ते जल देऊन उपोषण सोडवण्यात आले यावेळी कक्ष अधिकारी महेंद्रसिंग पाटील व विस्तार अधिकारी सुनील राकडे हे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments