सोयगाव तालुक्यातील अमृतेश्वर देवस्थान येथे शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न---



दिलीप शिंदे 
सोयगाव दि.०८-- विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली सोयगाव शहरासह तालुक्यातील आमखेडा, गोदेगाव गटातील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक दि.०८ मंगळवारी बनोटी येथील अमृतेश्वर देवस्थान येथे आयोजित करण्यात आली होती. 


 शिवसेना उपनेते सुभाष पाटील, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र काळे, पद्माकर इंगळे , शिवसेना तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद गटनेते मनोज पेरे, छञपती संभाजीनगर शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. दि.१७ सप्टेंबर, मराठवाडा मुक्ती संग्राम, दिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे छञपती संभाजीनगर येथे येणार असल्याने सोयगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधी,पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उपस्थित पदाधिकारी यांनी केले आहे.या बैठकीला शिवसेना तालुकाप्रमुख दिलीप मचे,कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक भगवान वारगणे सोयगाव नगर पंचायत माजी,शिक्षण सभापती भगवान इगळे,बनोटी माजी सरपंच सागर पाटील,वरठान संरपच अनिल सोळुंके, जिल्हा परिषद सदस्या सौ,सुनिताबाई चंद्रशेखर चव्हाण, पंचायत समिती सदस्या सौ, वैभवी सागर पाटिल, विभाग प्रमुख राजेंद्र गव्हाड, बबन रोकडे,हिराजी दाभाडे,प्रताप उदा राठोड आदींसह आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments