राहाता तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त घोषित करा.. विठ्ठलराव शेळके

राहाता (वार्ताहर) राहाता तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर करून तातडीने शेतकऱ्यांना विमा रक्कम देण्यासाठी विमा कंपनीला भाग पाडावे अन्यथा या प्रश्नावर आंदोलन छेडले जाईल अशा आशयाचे निवेदन शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब कोळेकर (शिडी॔) यांना दिलेआहे..


शेतकरी संघटनेच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावर्षी गेली ३५ दिवस पावसाचा खंड पडल्याने शेतीतील खरीप हंगामातील उभे पिके जळाली आहे.तरी सरकारने एकरी ५० हजार रुपये दूष्काळ निधी द्यावा व विमा कंपनीला तातडीने शंभर टक्के विमा देण्याचे भाग पाडावा.विमा कंपनीने सरकारमधील लोकप्रतीनीधी, महसूल व कृर्षी विभागाचे आधीकारी यांना हाताशी धरुन पिक कापणी प्रयोग व उबंरठा उत्पादन हा निकष लावून मागील वर्षी कपाशी, तुर ,बाजरी व काही फळबाग शेतकऱ्यांचा विमा परतावा नाकारला . यासर्दंभात शेतकरी संघटनेने अनेक वेळा निवेदन दिले काही ठिकाणी आंदोलने केली पंरतू आत्तापर्यंत ह्या पिकांचा विमा मिळला नाही. यावर्षी गेली अनेक वर्षापासून असा पावसाचा मोठा खंड पडला नाही त्यामुळे सरकारने कुठलाही निकष न लावता शंभर टक्के विमा परतावा द्यावा व नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रूपये तातडीने द्यावे राज्यातील विमा कंपन्या गेली अनेक वर्षापासून हजोरी कोटी नफा मिळवता यावर्षी खरीपातील सर्व पिके जळून गेली आहे तरी पिक कापणी प्रयोग व उंबरठा उत्पादन अहवालाची गरज नसल्याचे शेळके यांनी म्हटले आहे.

 या निवेदनावर शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके, ज्ञानेश्वर सोडणार, रूपेंद्र काले, शंकरराव लहारे ,सावळेराम आहेर, दत्तात्रय यादव, रेवणनाथ डोखे, बाळासाहेब भालेराव, राजेंद्र गोरडे, होशीराम चोळके, नितीन आग्रे, नारायण घोरपडे, ,सोमनाथ दरंदले ,हरीभाऊ वाघ ,संजय धनवटे, संजय एलम ,बाळासाहेब एम लहारे, दत्तात्रय कोते, महेश लहारे आधी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.अप्पर जिल्हाआधीकारी यांनी आपले निवेदन तातडीने शासनाकडे कार्यवाही करण्यासाठी पाठवले जाईल असे आश्वासन दिले

Post a Comment

0 Comments