संपूर्ण विश्वाला सर्वधर्मसमभावाची शिकवण देणाऱ्या व आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या श्री साईबाबांच्या शिर्डी व परिसरात आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची शासकीय जयंती सात सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
शिर्डी नगर परिषदेच्या वतीने शिर्डी नगरपरिषद कार्यालयात आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे नगराध्यक्ष सौ जयश्री ताई विष्णु थोरात व उपनगराध्यक्ष अभय राजे शेळके यांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी राजे उमाजी नाईकांचा जयजयकार करण्यात आला. या कार्यक्रमाला नगरसेवक तसेच मुख्याधिकारी सतीश दिघे साहेब व नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह डॉक्टर किरण भोईटे, अशोकराव ढवळे, पत्रकार राजेंद्र गडकरी, राहुल मदने, राजेंद्र मदने, रवींद्र गडकरी, आदींसह समाज बांधव उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांनी राजे उमाजी नाईकांना जयंतीनिमित्ताने अभिवादन केले.
इंग्रजांना सलग १४ वर्षे सळो की पळो करून सोडणारे व देश स्वातंत्र्यासाठी सर्वप्रथम बलिदान देणारे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची शासकीय जयंती तालुक्यातील ठीक ठिकाणी साजरी करण्यात आली. पत्रकार राजेंद्र गडकरी यांनी राजे उमाजी नाईक यांचा महान इतिहास यावेळी उपस्थितांना सांगत त्यांचा इतिहास विस्तृत प्रमाणात आगामी शैक्षणिक वर्षात पाठ्यपुस्तकात घ्यावा अशी मागणी केली.व त्यांना जयंती निमित्ताने ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले.
0 Comments